मुलीचा मुलगा असल्याने जेव्हा आंदेकर कोमकरांचे संबंध चांगले होते तेव्हा जवळच राहत असल्याने आयुष सतत बंडू आंदेकरकडे म्हणजे आजोबांकडे जायचा. त्याचं टोपण नाव बंडू आंदेकरने गोविंदा ठेवलं होतं असं चौकशी दरम्यान त्याने पोलिसांना सांगितलय … कधी काळी नातू म्हणून त्याचं नाव ठेऊन त्याला अंगाखांद्यावर खेळवून एखाद्या दिवशी त्याचाच जीव घ्यायला सांगणं ही कुठली मानसिकता अशी चर्चा सध्या सुरू आहे. आंदेकर-कोमकर यांच्या वैमनस्यामुळेच हा खून घडल्याचे स्पष्ट होत आहे.
advertisement
आंदेकर- कोमकर संघर्षातून हत्या
मागील वर्षी वनराज आंदेकर यांची हत्या झाली होती. त्यात गणेश कोमकरचा संबंध आल्याचे पोलिस तपासात उघड झाले होते. त्या खुनाच्या पार्श्वभूमीवर हा ताजा खून म्हणजे सूडाचा भाग असल्याचे पोलिस तपासात समोर आलंय. आयुष कोमकर हा केवळ 19 वर्षांचा होता. तो क्लासवरून परत येत असताना दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. घटनास्थळी मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींचा शोध सुरू असून, बंडू आंदेकरसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
मकोका अंतर्गत कारवाई
या प्रकरणात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आंदेकर-कोमकर टोळ्यांचा दीर्घकाळ चाललेला संघर्ष आणि त्यातील वाढती रक्तपाताची मालिका पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. तपास पुढे जात असताना आणखी आरोपी गजाआड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आंदेकर टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई
इंजिनिअर नातवाला संपवणाऱ्या बंडू आंदेकरवर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करत आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह तेरा जणांवर गुन्हा दाखल केला. आता या प्रकरणी पोलिसांनी आंदेकर टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई केली.
हे ही वाचा :