मुंबई शहर आणि उपनगरामध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. तर मुंबईतील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. तर पुण्यामध्ये दुपारपर्यंत निरभ्र आकाश राहणार असून त्यानंतर आकाश ढगाळ होण्यास सुरुवात होईल. पुण्यातील कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूरमध्ये सकाळच्या वेळी धुके राहण्याची शक्यता असून त्यानंतर आकाश अंशतः ढगाळ राहील. कोल्हापूरमध्ये कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस एवढे असेल.
advertisement
चुकीचे प्रॉडक्ट त्वचेला पोहोचवतील हानी, उन्हाळ्यात सनस्क्रीन वापरताना घ्या ‘ही’ काळजी Video
राज्यातील जास्तीत जास्त कमाल तापमानाची नोंद मराठवाड्यात करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमध्ये पुढील 24 तासांमध्ये 38 कमाल तापमान राहणार असून किमान तापमान हे 23 अंश सेल्सिअस एवढे असणार आहे. तर आठवड्याच्या शेवटी मराठवाड्यातील कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये मुख्यतः निरभ्र आकाश राहणार असून कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस एवढे असणार आहे. राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये ढगाळ आकाश राहणार असून कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे.