गायकवाड यांनी सांगितले की, दिवाळीच्या काळात खासगी बसचालकांनी नियमांचे पालन करावे. एसटीच्या तिकिटापेक्षा दीडपट एवढ्याच दराने तिकीट आकारण्याची परवानगी आहे. त्यापेक्षा जास्त दर घेणे कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रकारची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित चालक व मालकांविरोधात तत्काळ कारवाई करण्यात येईल.
advertisement
रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने वाहनचालकांना काही महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या. वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये, मद्यपान करून वाहन चालवू नये, वाहन रस्त्यावर धोकादायक पद्धतीने उभे करू नये. तसेच वाहनाची सर्व वैध कागदपत्रे जवळ बाळगावीत, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.
तक्रार कशी कराल?
प्रवाशांच्या हिताचे संरक्षण हे सर्वोच्च प्राधान्य असून नियमभंग सहन केला जाणार नाही. प्रवाशांकडून जर तिकीटदरात जादा वसुली झाल्यास त्यांनी त्वरित तक्रार नोंदवावी. त्यासाठी आरटीओने विशेष हेल्पलाईन क्रमांक आणि ई-मेल जाहीर केले आहेत. नागरिकांनी 8275330101 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा rto.12-mh@gov.in या ई-मेलवर तक्रार पाठवावी. तक्रारीसोबत आपले नाव, मोबाईल क्रमांक आणि तिकिटाचा फोटो पाठवावा, अशी सूचना आरटीओकडून देण्यात आली आहे.
आरटीओच्या या कारवाईमुळे दिवाळीच्या गर्दीत प्रवाशांना होणाऱ्या आर्थिक शोषणावर काही प्रमाणात नियंत्रण येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.