पुणे शहरात फीडर पॉईंटवरून कचरा उचलायला येणाऱ्या गाड्या वेळेवर येत नाहीत, त्यामुळे सगळं काम विस्कळीत होतं. अनेक ठिकाणी गाड्या तीन-चार तास उशिरा येतात. तोपर्यंत कचरा साचतो, दुर्गंधी पसरते आणि कामगारांना जागेवरच थांबावं लागतं. गाडी वेळेवर आली नाही की आमचं पुढचं काम थांबतं. आम्हाला जेवायला पण वेळ मिळत नाही, आणि फीडरवर शौचालयही नसतं अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, असे कचरा वेचक सिंधू हनवटे यांनी सांगितलं.
advertisement
पुणेकरांचा वेळ वाचणार, लवकरच तिसरा डबलडेकर उड्डाणपूल, कुठून कसा असेल मार्ग?
आकडेवारीनुसार या भागांत सर्वाधिक विलंब
कोथरूड–बावधन : 47% दिवस गाड्या उशिरा, 3% दिवस गैरहजर
वारजे–कार्वेनगर : 41% दिवस उशिरा, 11% दिवस गैरहजर
कोंढवा–येवलेवाडी : 42% दिवस उशिरा, 5% दिवस गैरहजर
औंध–बाणेर : 38% दिवस उशिरा, 12% दिवस गैरहजर
नागर रोड–वडगाव शेरी : 11% दिवस गाड्या गैरहजर
विमाननगर परिसरात ‘विश्वास 2025’ नावाचा पायलट प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत मशीनद्वारे थेट कचरा संकलन सुरू करण्यात आले आहे. मात्र, कचरावेचक महिलांनी या नव्या पद्धतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. प्रक्रिया केंद्रांची क्षमता वाढवली नाही, तर ही पद्धत टिकणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.






