Pune News: … म्हणून पुण्यात दुर्गंधी, चार दिवस कचरा जागेवर, कचरावेचक महिलांनी कुणावर फोडलं खापर?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Pune News: पुण्यातील कचऱ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 3-4 दिवस गाड्या उशिरा येत असून परिसरात दुर्गंधी निर्माण होत आहे.
पुणे : पुण्यातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कचरा वाहतुकीच्या गाड्यांना वारंवार होणाऱ्या उशिरामुळे कचरा वेचणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी गाड्या तब्बल तीन ते चार तास उशिरा येतात, असा आरोप कचरावेचक महिलांनी केला आहे. या विलंबामुळे ठिकठिकाणी कचरा साचतो, दुर्गंधी पसरते आणि वेळेवर कचरा न उचलल्याचा दोष आम्हालाच दिला जातो, अशी खंत कामगारांनी व्यक्त केली आहे.
पुणे शहरात फीडर पॉईंटवरून कचरा उचलायला येणाऱ्या गाड्या वेळेवर येत नाहीत, त्यामुळे सगळं काम विस्कळीत होतं. अनेक ठिकाणी गाड्या तीन-चार तास उशिरा येतात. तोपर्यंत कचरा साचतो, दुर्गंधी पसरते आणि कामगारांना जागेवरच थांबावं लागतं. गाडी वेळेवर आली नाही की आमचं पुढचं काम थांबतं. आम्हाला जेवायला पण वेळ मिळत नाही, आणि फीडरवर शौचालयही नसतं अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो, असे कचरा वेचक सिंधू हनवटे यांनी सांगितलं.
advertisement
आकडेवारीनुसार या भागांत सर्वाधिक विलंब
कोथरूड–बावधन : 47% दिवस गाड्या उशिरा, 3% दिवस गैरहजर
वारजे–कार्वेनगर : 41% दिवस उशिरा, 11% दिवस गैरहजर
कोंढवा–येवलेवाडी : 42% दिवस उशिरा, 5% दिवस गैरहजर
औंध–बाणेर : 38% दिवस उशिरा, 12% दिवस गैरहजर
नागर रोड–वडगाव शेरी : 11% दिवस गाड्या गैरहजर
advertisement
विमाननगर परिसरात ‘विश्वास 2025’ नावाचा पायलट प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत मशीनद्वारे थेट कचरा संकलन सुरू करण्यात आले आहे. मात्र, कचरावेचक महिलांनी या नव्या पद्धतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. प्रक्रिया केंद्रांची क्षमता वाढवली नाही, तर ही पद्धत टिकणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 11, 2025 12:56 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: … म्हणून पुण्यात दुर्गंधी, चार दिवस कचरा जागेवर, कचरावेचक महिलांनी कुणावर फोडलं खापर?


