TRENDING:

अखेर पुणे–सातारा महामार्गाचं काम पूर्ण, या वाहनांना मिळणार पर्यायी मार्ग, नेमका बदल काय?

Last Updated:

अखेर पुणे–सातारा महामार्गाचे नूतनीकरण पूर्ण झाले आहे. आता दुचाकी आणि हलक्या वाहनांची वाहतूक मुख्य महामार्गाऐवजी वेगळ्या सेवा मार्गांवर वळवण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील पुणे-सातारा महामार्गाच्या नूतनीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. त्यामुळे याठिकाणी होत असलेली वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने हा महत्त्वाचा प्रकल्प हाती घेतला होता. याठिकाणी काम पूर्ण झाल्यामुळे आता प्रवाशांचा वेळ वाचणार असून, वाहतूक सुरळीत होण्यास मोठा हातभार लागणार आहे. याठिकाणी असणाऱ्या मुख्य मार्ग आणि इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आली आहे.
अखेर पुणे–सातारा महामार्गाचं काम पूर्ण ; काही वाहनांना मिळणार पर्यायी मार्ग
अखेर पुणे–सातारा महामार्गाचं काम पूर्ण ; काही वाहनांना मिळणार पर्यायी मार्ग
advertisement

काय सुधारणा झाली?

या प्रकल्पाअंतर्गत मुख्य रस्ता सुधारण्यात आला असून, अनेक ठिकाणी सेवा रस्त्यांचे रुंदीकरण करून 2 लेनवरून 3 लेन करण्यात आले आहे. NHAI ने दिलेल्या माहितीनुसार, या मार्गावर एकूण 120 किमी सेवा रस्ते आहेत, त्यापैकी 40 किमी रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले आहे. हे सेवा मार्ग आता 10.5 मीटर रुंद असल्यामुळे वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. आता हे सेवा मार्ग तीन पदरी झाले आहेत. या सेवा मार्गांमुळे लोकल तसेच दुचाकी वाहनांची वाहतूक मुख्य महामार्गावरून वळवता येणार असून, त्यामुळे मुख्य मार्गावरील ताण कमी होणार आहे.

advertisement

Shocking : वाढदिवशीच स्वत:चा अंगाला चावू लागली चिमुकली निशा, आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली, अखेर सोडला श्वास

दुचाकी वाहनांची वाहतूक वळवली

पुणे-सातारा महामार्गाचे नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर लहान आणि दुचाकी वाहनांची वाहतूक आता सेवा मार्गांकडे वळवण्यात आली आहे. यामुळे महामार्गावरील कोंडी आणि अपघातांची समस्या कमी झाली आहे, आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर, NHAI ने पुणे-मुंबई दरम्यान प्रस्तावित नव्या द्रुतगती मार्गाचा DPR मंजूर केला आहे. या मार्गामुळे सध्याच्या मार्गावरील कोंडी कमी होईल आणि प्रवासाचा वेळ सुमारे 90 मिनिटांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी गेली, 2 भावांनी सुरू केला अंडा रोल व्यवसाय, महिन्याची उलाढाल आता लाखात
सर्व पहा

NHAI पुणेचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी सांगितले, पुणे-सातारा महामार्गावर वारंवार होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातप्रवण ठिकाणांवर उपाययोजना करणे हा आमचा मुख्य उद्देश होता. मुख्य रस्त्याचे नूतनीकरण आणि सेवा रस्त्याला तिसरी लेन जोडल्यामुळे हलकी तसेच जड वाहनांसाठी अधिक सक्षम आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण झाली आहे. रस्त्याची रुंदी वाढल्याने अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
अखेर पुणे–सातारा महामार्गाचं काम पूर्ण, या वाहनांना मिळणार पर्यायी मार्ग, नेमका बदल काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल