पुणे : गणपती उत्सव हा आता काही दिवसावर आला आहे. दरवर्षी गणपतींमध्ये मुख्य आकर्षण हे देखावे असतात. त्यात पुण्यातील गणपतींना देखाव्याची मोठी परंपरादेखील आहे. येथील दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पुणेकरच नव्हे तर बाहेरील देशातील नागरिकही येत असतात. त्याचप्रमाणे आता गणपतीच्या देखाव्याच काम हे सध्या जोरदार सुरू झाले आहे.
या वर्षी दगडूशेठ गणपतीच्या देखाव्यात म्हणून हा हिमाचल प्रदेश येथील जटोली शिवमंदिर तयार केले जात आहे. तर ते बनवण्याची जोरदार तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. नेमकी याठिकाणी तयारी कशी सुरू आहे, याबाबतचा लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.
advertisement
याठिकाणी आहे भीमा-सीना नदीचा संगम, राज्याबाहेरुनही येतात लोकं, जागेला विशेष धार्मिक महत्त्व, VIDEO
111 फूट उंच गाभारा -
भारतभरातील विविध मंदिराच्या प्रतिकृती या देखाव्याच्या माध्यमातून सादर केल्या जातात. यावर्षी हिमाचल प्रदेश येथील जटोली शिवमंदिर तयाराचा देखावा तयार केला जात आहे. आता 60 ते 70 टक्के तयारी ही पूर्ण होत आली आहे. पूर्ण देखावा हा दहीहंडीपर्यंत पूर्ण केला जाणार आहे. आशिया खंडातील शंकराचे सर्वात उंच असे हे जटोली शिवमंदिर आहे आणि याची उंची तब्बल 111 फूट इतकी आहे. त्यामुळे याठिकाणी 111 फूट उंचीच्या गाभाऱ्यात रत्नजडीत असे मखर असेल आणि मागील बाजूस संपूर्ण 12 बारा ज्योतिर्लिंगाच्या प्रतिकृती रेखाटल्या जाणार आहेत.
200 कारागीर -
तसेच याठिकाणी सध्या तब्बल 200 कारागीर हा देखावा तयार करण्याचे काम करत आहेत. पुणे, सातारा आणि मुंबई या तीन ठिकाणांहून हे सर्व काम सुरू आहे. कला दिग्दर्शक अमनजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा देखावा तयार केला जात आहे. गणपतीच्या 10 दिवसात 2 कोटी लोक हे दर्शन घेतात आणि यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्तही असतो.
जीवनशैलीत करा फक्त हे 5 बदल अन् लठ्ठपणाला करा बाय बाय, महत्त्वाची माहिती..
तर मंदिर परिसरात 150 कॅमेरे देखील लावले जातात. सर्व व्यवस्था ही दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून चोख केली जाणार आहे. यामुळे नागरिकांच दर्शन हे सुलभ होईल. भारतातीलच नाही तर विदेशातील लोकंही इथे दर्शनासाठी येतात. त्यामुळे कित्येक पटीने भाविकांची संख्या ही वाढत चालली आहे, अशी माहिती कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी दिली.