TRENDING:

जेव्हा मनोहर जोशींनी सुरू केलं झुणका-भाकर केंद्र, आठवणीत शिवसैनिक भावूक

Last Updated:

ठाकरे घराण्याच्या चार पिढ्या पाहिलेला, प्रबोधनकार ठाकरेंपासून आदित्य ठाकरेंपर्यंत शिवसेनेशी एकनिष्ठ असणारा नेता म्हणून त्यांची ओळख सर्वश्रुत आहे. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरलीये.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
advertisement

पुणे : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉक्टर मनोहर जोशी यांचं आज (23 फेब्रुवारी) निधन झालं. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ठाकरे घराण्याच्या चार पिढ्या पाहिलेला, प्रबोधनकार ठाकरेंपासून आदित्य ठाकरेंपर्यंत शिवसेनेशी एकनिष्ठ असणारा नेता म्हणून त्यांची ओळख सर्वश्रुत आहे. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरलीये. पुण्यातील जेष्ठ शिवसैनिक रामभाऊ पारीख यांनी मनोहर जोशी यांच्या आठवणींना उजाळा दिला.

advertisement

शिवसैनिक रामभाऊ पारीख यांनी सांगितलं की, 'मनोहर जोशी सर हे शिवसैनिकांना सांभाळणारे नेते होते. बाळासाहेबांनी तयार केलेल्या अष्टप्रधान मंडळात मनोहर जोशी एक अत्यंत हुशार शिवसैनिक होते. मला त्यांच्या जवळ राहण्याचा योग आला. 1994 साली मी त्यांना राजगड स्मारक समितीच्या वतीने निमंत्रण दिलं होतं. त्यानंतर ते मुक्कामाला पुण्यात आले आणि आम्ही तिथून राजगडला गेलो. तिथे आम्ही महाराजांना नवस केला की, मनोहर जोशी मुख्यमंत्री व्हावेत आणि त्यानंतर त्यांनी इथे यावं. ही घटना आम्ही जोशी सरांना सांगितली. मग 1995 साली जेव्हा मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्रीपदाची शप्पथ घेतली, त्यानंतर ते थेट राजगडला आले. त्यावरूनच मला पुन्हा एकदा कळलं की, जोशी सर हे शब्द पाळणारे आणि शिवसैनिकांना महत्त्व देणारे नेते आहेत.'

advertisement

जेव्हा मुख्यमंत्री झाल्यावर मनोहर जोशी स्वत: चप्पल घेऊन आले...पुण्यातल्या शिवसैनिकाने सांगितला 'तो' किस्सा

View More

'मनोहर जोशी हे कार्यकर्त्यांचा विचार करणारे नेते होते. विटी स्टेशनसमोर पहिलं झुणका-भाकर केंद्र त्यांनी सुरू केलं. या केंद्रातून त्यांनी अनेक शिवसैनिकांना रोजगार दिला. त्यात मीसुद्धा होतो. इतकंच नाही, तर त्या झुणका-भाकर केंद्रावर प्रत्येक गोरगरीब माणूस जेवायचा. सभा संपल्यावर आम्हीसुद्धा त्याठिकाणी जेवायला जायचो. सामान्य शिवसैनिकांची परिस्थिती सुधारण्यासाठी मनोहर जोशी यांनी संपूर्ण राज्यभरातील शिवसैनिकांना झुणका-भाकर केंद्र चालवायला दिले होते. अवघ्या 1 रुपये भाडेतत्त्वावर आम्ही हे केंद्र चालवले. असा नेता आमच्यातून गेल्याने आज खूप काही गमावल्याच्या भावना मनात आहेत', असं रामभाऊ पारीख म्हणाले.

advertisement

Manohar Joshi : माझं रक्त शिवसेनेसोबत…; शेवटपर्यंत सेनेसोबतच राहिले मनोहर जोशी

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, हृदयविकाराचा झटका आल्याने मनोहर जोशी यांना गुरुवारी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती सातत्याने खालवत होती आणि शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
जेव्हा मनोहर जोशींनी सुरू केलं झुणका-भाकर केंद्र, आठवणीत शिवसैनिक भावूक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल