Manohar Joshi : माझं रक्त शिवसेनेसोबत...; शेवटपर्यंत सेनेसोबतच राहिले मनोहर जोशी

Last Updated:

शिवसेनेत फूट पडल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते मनोहर जोशी हे कोणासोबत? ते शिंदे गटात जाणार का? याच्या चर्चा सातत्याने रंगल्या.

News18
News18
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत फूट पडली. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेंचे अनेक सहकारी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हही एकनाथ शिंदे यांना मिळाले. याच वेळी माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते मनोहर जोशी हे कोणासोबत? ते शिंदे गटात जाणार का? याच्या चर्चा सातत्याने रंगल्या. मनोहर जोशी यांचं २३ फेब्रुवारीला पहाटे ३ वाजता निधन झालं. त्यांनी २ डिसेंबर २०२२ रोजी वाढदिवशी आपली भूमिका स्पष्ट केली होती.
मनोहर जोशी हे शिवसेनेचे कडवट शिवसैनिक होते. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या एका आदेशावर मुख्यमंत्रीपदाचा त्यांनी राजीनामा दिला होता. शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री असणाऱ्या मनोहर जोशींची वयाच्या ८६ व्या वर्षी प्राणज्योत मालवली. शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मनोहर जोशी यांची भेट घेतली होती.
advertisement
दरम्यान, २०१३च्या शिवसेना दसरा मेळाव्यात मनोहर जोशींना शिवसैनिकांच्या नाराजीचा सामना करावा लागला होता. शिवसैनिकांच्या घोषणाबाजीमुळे मनोहर जोशींना निघून जावं लागलं होतं. सभेवेळी घोषणाबाजी सुरू होताच तिथे उद्धव ठाकरेंनी ही घोषणाबाजी थांबवण्याचाही प्रयत्न केला नव्हता. तेव्हा शिवसैनिकांना नमस्कार करून मनोहर जोशी व्यासपीठावरून निघून गेले होते. त्यामुळे मनोहर जोशी हे ठाकरेंवर नाराज असल्याच्या चर्चा सातत्याने होत होत्या.
advertisement
शिवसेनेत फुटीनंतर याच नाराजीमुळे ते शिंदेंसोबत जातील असं म्हटलं जात होतं. पण मनोहर जोशींनी २०२२ मध्ये शिंदे गटात फूट पडल्यानंतर म्हटलं होतं की, माझं रक्त शिवसेनेचं आहे. आधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा सहवास, नंतर उद्धवजींचा सहवास, मी महाराष्ट्र आणि शिवसेनेसाठी आहे. मी पहिल्यापासून आतापर्यंत शिवसेनेत आहे. मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत सातत्याने उभा आहे असं सांगत त्यांनी शिंदेंसोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Manohar Joshi : माझं रक्त शिवसेनेसोबत...; शेवटपर्यंत सेनेसोबतच राहिले मनोहर जोशी
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement