Kangana Ranaut : न्यायालात पोहोचली कंगना रणौत, 5 वर्षांनंतर त्या प्रकरणी मागितली माफी, नेमकं काय झालं?

Last Updated:

Kangana Ranaut : खासदार झालेल्या कंगना रणौतने पाच वर्षापूर्वीच्या एका प्रकरणात कोर्टासमोर माफी मागितली आहे. नेमकं प्रकरण काय आहे?

News18
News18
बॉलिवूड सोडल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौतनं राजकारणात नशीब आजमवलं आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कंगना हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून विजयी झाली. ती भाजपची खासदार झाली. त्यानंतर ती सातत्यानं चर्चेत आहे. दरम्यान खासदार झालेल्या कंगना रणौतने पाच वर्षापूर्वीच्या एका प्रकरणात कोर्टासमोर माफी मागितली आहे.
2020 साली कंगनाने सोशल मीडियावर केलेल्या वादग्रस्त पोस्टबाबत आता तिने न्यायालयात दिलगिरी व्यक्त केली आहे. कंगना राणौतने इंस्टाग्राम आणि ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात तिने महिंदर कौर या शेतकरी कार्यकर्त्या महिलेला शाहीन बाग आंदोलनातील 'बिल्किस दादी' अशी चुकीची ओळख करून दिली होती. त्याचबरोबर 100 साठी आंदोलनात सहभागी होतात, असा आरोपही केला होता. कंगनाच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. महिंदर कौर यांनी कंगनाविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला.
advertisement

कंगनाचं स्पष्टीकरण 

दरम्यान सोमवारी भटिंडा न्यायालयात हजर राहून कंगनाने आपल्या पोस्टबद्दल माफी मागितली. ती म्हणाली, "ते फक्त एक नॉर्मल मीम होतं. मी स्वतः लिहिलेलं नव्हतं. फक्त रिट्विट केलं होतं. मी माताजींच्या पतीला भेटले आणि गैरसमज दूर केला. मला कधीच वाटलं नव्हतं की या प्रकरणावर एवढा वाद निर्माण होईल."
advertisement
महिंदर कौर यांनी दाखल केलेल्या खटल्यानंतर भटिंडा न्यायालयाने या प्रकरणात कंगनाला समन्स बजावले होते. महिंदर कौर यांच्या वकिल रघुबीर सिंग बेनीवाल यांनी सांगितले की, कंगना न्यायालयात जामीनपत्र सादर करण्यासाठी आणि तक्रारदाराची माफी मागण्यासाठी आली होती. महिंदर कौर आजारी असल्याने त्यांचे पती न्यायालयात उपस्थित होते. न्यायालयाने विचारल्यावर त्यांनी सांगितले की ते निर्णय घेण्यापूर्वी शेतकरी संघटनांशी चर्चा करतील. या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Kangana Ranaut : न्यायालात पोहोचली कंगना रणौत, 5 वर्षांनंतर त्या प्रकरणी मागितली माफी, नेमकं काय झालं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement