गुरुपुष्यामृत योग हा शुभ कार्यासाठी, विशेषतः सोने, चांदी आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी यासाठी अत्यंत फलदायी मानला जातो. यंदा हा योग आषाढ अमावास्येशी एकत्र आल्यामुळे अनेकांना संभ्रम वाटत आहे की अशा वेळी खरेदी करणे योग्य ठरेल का? या विषयीची माहिती आदित्य जोशी गुरुजी यांनी दिली आहे.
Gatari Amavasya: गटारी नव्हे, ही तर गतहारी अमावस्या! मुहूर्त आणि पूजा पद्धती, संपूर्ण माहिती
advertisement
या संदर्भात मुंबईतील आदित्य जोशी गुरुजी यांनी सांगितले की, गुरुपुष्यामृत योग आणि आषाढ अमावस्या या दोन्हीच्या संयोगामुळे हा दिवस अत्यंत शुभ व प्रभावी मानला जातो. गुरुपुष्यामृत म्हणजे गुरुवारी येणारे पुष्य नक्षत्र ज्यामध्ये शनी आणि बृहस्पतीचा सकारात्मक प्रभाव असतो. त्यामुळे या काळात सोने खरेदी केल्यास ते दीर्घकाळ टिकणारे, संपत्ती वाढवणारे आणि समृद्धी करणारे ठरते.
या वर्षी गुरुपुष्यामृत योग फक्त दीड तासांसाठी असला तरी, त्या वेळेत खरेदी केल्यास त्याचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व अधिक आहे. आषाढ अमावास्या ही चातुर्मासातील पहिली अमावास्या असल्याने पितृस्मरण, दानधर्म आणि अध्यात्मिक साधनेसाठीही हा दिवस महत्त्वाचा आहे.
म्हणूनच यंदाचा गुरुपुष्यामृत योग आणि आषाढ अमावास्या यांचा संयोग फक्त दुर्लभ नाही, तर सोने आणि चांदी खरेदीसाठी अत्यंत शुभ संधी आहे. ज्यांना खरेदी करायची असेल त्यांनी दुपारी 4.43 ते 6.13 या शुभ मुहूर्ताचा लाभ घ्यावा, असा सल्ला ज्योतिष तज्ज्ञांनी दिला आहे.