Astro Tips: पाण्यासारखा पैसा वाया जातो! शनिवारी केलेल्या या गोष्टी फक्त पश्चाताप करायला लावतात

Last Updated:

Astro Tips Marathi: शनिवारी केस-नखं कापू नयेत असं आपण वडिलधाऱ्या लोकांकडून ऐकत आलो आहे. नखे कधी आणि कोणत्या दिवशी कापावीत याबद्दल अनेक समजुती आहेत.

News18
News18
मुंबई : हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्रामध्ये दैनंदिन कामांसाठी काही नियम सांगितले आहेत, जसे की केस कधी धुवावेत किंवा नखे कधी कापावीत. विशेषतः शनिवारच्या दिवसाबाबत लोकांमध्ये अनेक प्रश्न असतात. शनिवारी केस-नखं कापू नयेत असं आपण वडिलधाऱ्या लोकांकडून ऐकत आलो आहे. नखे कधी आणि कोणत्या दिवशी कापावीत याबद्दल अनेक समजुती आहेत.
शनिवारी नखे कापण्यासंबंधी नियम - शनिवारी नखे कापू नयेत, शनिवारी नखे कापल्याने कुंडलीतील शनि ग्रहाची स्थिती बिघडते आणि व्यक्तीला अनेक प्रकारचे शारीरिक त्रास होऊ शकतात. शनिवारचा दिवस न्याय आणि कर्मफळाचा कारक शनिदेवाला समर्पित आहे. अशावेळी शनिवारी नखे कापल्यास शारीरिक आणि मानसिक त्रास वाढू लागतो आणि त्या व्यक्तीवर शनिदेवाची क्रूर दृष्टी पडते, ज्यामुळे जीवनातील अडचणी सतत वाढत राहतात. एवढेच नाही, तर शनिवारी ज्या घरात नखे कापली जातात, त्या घरातून माता लक्ष्मी रुसून निघून जाते आणि परत येत नाही. त्यामुळे शनिदोषापासून वाचण्यासाठी शनिवारी नखे कापणे टाळावे.
advertisement
कोणत्या दिवशी नखे कापू नयेत
रविवार: हा दिवस सूर्य देवाचा आहे. या दिवशी चुकूनही नखे कापू नयेत. यामुळे कुंडलीत सूर्य कमजोर होतो, ज्यामुळे तुमची बदनामी होऊ शकते.
सोमवार: हा दिवस चंद्र देवाचा आहे. या दिवशी नखे कापू नका, अन्यथा तुम्ही मानसिकरित्या त्रस्त होऊ शकता.
मंगळवार: हा दिवस मंगळ देवाचा आहे. या दिवशी नखे कापणे शारीरिक कष्ट देऊ शकते.
advertisement
गुरुवार: हा दिवस भगवान विष्णू आणि देव गुरु बृहस्पतीचा आहे. या दिवशी नखे कापल्याने तुमचे ज्ञान कमी होऊ शकते आणि तुमचे भाग्य खराब होऊ शकते.
कोणत्या दिवशी नखे कापावीत
बुधवार: हा दिवस नखे कापण्यासाठी शुभ मानला गेला आहे.
advertisement
शुक्रवार: हा दिवस देखील नखे कापण्यासाठी शुभ मानला गेला आहे.
वेळेनुसार आणि तिथीनुसार नियम
सूर्यास्तानंतर नखे कापू नयेत, यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला नखे कापणे टाळावे.
बिछान्यावर (बिस्तर) नखे कापू नयेत. यामुळे धनाची हानी होऊ शकते. काही पवित्र तिथी आणि सणांच्या दिवशी नखे कापू नका, जसे की: एकादशी,  गुरु पौर्णिमा नवरात्री इ.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Astro Tips: पाण्यासारखा पैसा वाया जातो! शनिवारी केलेल्या या गोष्टी फक्त पश्चाताप करायला लावतात
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement