देवघर : मकर संक्रांतीपासून शुभकार्यांना सुरुवात झाली आहे. शिवाय खरमास संपताच लग्नसराईदेखील सुरू होईल. आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा मित्रमंडळींमध्ये कोणाचं लग्न असेल तर त्यांना नेमकं काय गिफ्ट द्यायचं हे आपलं ठरलं असेलच. परंतु त्यांचा संसार खरोखर सुखाचा व्हावा, असं आपल्याला वाटत असेल तर आपण त्यांना न विसरता फुलं देणं आवश्यक आहे. म्हणजेच साधा का होईना पण त्यांना एक फुलांचा गुच्छ गिफ्ट करा.
advertisement
लग्नात साधारणतः आहेरात सोन्याचे दागिने दिले जातात. काहीजण शोभेच्या वस्तू देतात, तर काहीजण भांडीदेखील देतात. तर, अनेकजण थेट पैशांचा आहेर करतात. त्यामुळे नवविवाहित दाम्पत्याला त्यातून त्यांच्या आवडीची वस्तू खरेदी करता येते. परंतु ज्योतिषशास्त्रानुसार पाहता, आपण लग्नात नवविवाहित दाम्पत्याला फुलं भेट म्हणून दिलीत तर त्यांच्या सुखी संसारासाठी त्यापेक्षा चांगलं दुसरं काही गिफ्ट असूच शकत नाही. यामागचं नेमकं कारण काय, जाणून घेऊया.
झारखंडमधील देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते सांगतात, फुलं हा देवपूजेत वापरला जाणारा एक अविभाज्य घटक आहे. देवाला आपण न विसरला फुलं अर्पण करतो. त्यामुळे आपल्या आयुष्यातल्या कित्येक अडचणी दूर होतात. शिवाय फुलांमुळे मन प्रसन्न राहतं आणि जगण्यात सकारात्मकता येते. देवपूजेप्रमाणेच आपण लग्न किंवा कोणत्याही शुभकार्यात भेटवस्तू म्हणून किंवा एखाद्या भेटवस्तूसोबत फुलं द्यायलाच हवी. त्यामुळे जी व्यक्ती आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करणार आहे किंवा तिच्या आयुष्यातला एखादा महत्त्वाचा प्रसंग असेल, तर फुलं पाहून तिचा आनंद द्विगुणीत होईल आणि तिच्या आयुष्यातल्या अडचणीही दूर होतील.
Chanakya Niti : ...म्हणून सुंदर स्त्रीशी करू नका लग्न; आचार्य चाणक्य यांनी सांगितलं कारण
नेमकी कोणत्या रंगाची फुलं द्यावी?
ज्योतिषांनी दिलेल्या माहितीनुसार, वास्तूशास्त्रात फुलांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. लग्नात आपण वधू-वराला लाल, गुलाबी, निळ्या किंवा पिवळ्या रंगाच्या फुलांचा गुच्छ देऊ शकता. ही भेट त्यांच्यासाठी खरोखर लाभदायी ठरेल आणि फुलांप्रमाणे त्यांच्या संसारात सुगंध दरवळेल. एकूणच या रंगाची फुलं नवविवाहित दाम्पत्याच्या आयुष्यात सुख घेऊन येतील. शिवाय दोघांच्याही कुंडलीत काही दोष असतील तर ते दूर होतील.
लाल रंगाच्या फुलांमुळे कुंडलीतील शुक्र दोष नष्ट होतो, पिवळ्या रंगाच्या फुलांमुळे चंद्र दोष दूर होतो, तर निळ्या रंगाच्या फुलांमुळे शनीदोषापासून पूर्णपणे मुक्ती मिळते. त्यामुळे आपण आपल्या नातेवाईकांच्या किंवा मित्र-मैत्रिणींच्या लग्नात गेलात तर त्यांना या रंगाच्या फुलांचा गुच्छ द्यायला विसरू नका. या फुलांमधून त्यांना खऱ्या अर्थाने सुखी संसारासाठी तुमच्या शुभेच्छा मिळतील.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा