TRENDING:

Guru Pushya Yoga 2024: गुरुपुष्यामृत आज! खरेदीचा दुर्मीळ शुभ योग; या 5 गोष्टी केल्यानं पालटेल नशीब

Last Updated:

Guru Pushya Yoga 2024: गुरुपुष्यामृत योगासोबतच आज सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग यांचा दुर्मिळ संयोगही तयार झाला आहे. गुरुपुष्यामृत योगात काही काम केले तर धन आणि संपत्तीत वाढ होईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आज गुरुवार, 26 सप्टेंबर रोजी गुरुपुष्यामृत योग तयार होत आहे. हा अतिशय शुभ योग मानला जातो. गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं की, त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग तयार होतो. ज्योतिष शास्त्रानुसार, गुरुपुष्यामृत योगामध्ये तुम्ही अशी कामे करावीत ज्यात तुम्हाला स्थिर यशाची इच्छा आहे. या योगात केलेल्या कामाचे फळ दीर्घकाळापर्यंत मिळते. गुरुपुष्यामृत योगासोबतच आज सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग यांचा दुर्मिळ संयोगही तयार झाला आहे. गुरुपुष्यामृत योगात काही काम केले तर धन आणि संपत्तीत वाढ होईल. श्री कल्लाजी वैदिक विद्यापीठाच्या ज्योतिष विभागाचे प्रमुख डॉ. मृत्युंजय तिवारी यांच्याकडून जाणून घेऊया, गुरुपुष्यामृत योगामध्ये कोणते काम केले पाहिजे, ज्यामुळे धन-समृद्धी वाढते.
News18
News18
advertisement

गुरुपुष्यामृत योग कधी आणि किती काळ आहे?

26 सप्टेंबरला गुरुपुष्यामृत योग रात्रीच्या वेळी आहे. पंचांगानुसार, पुष्य नक्षत्र रात्री 11:34 वाजता सुरू होईल, ते 27 सप्टेंबर रोजी पहाटे 1:20 पर्यंत राहील. उदयतिथीनुसार गुरुपुष्यामृत योग 26 सप्टेंबर रोजी रात्री 11:34 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 06:12 पर्यंतच वैध असेल.

गुरुपुष्यामृत योगासोबतच अमृत सिद्धी योगही तयार होतोय. गुरुवारी दिवसभर सर्वार्थ सिद्धी योग राहील. हे दोन्ही योग अतिशय शुभ मानले जातात.

advertisement

गुरुपुष्यामृत योगात या 5 गोष्टी करा -

1. गुरुपुष्यामृत योगामध्ये सोने, त्यापासून बनवलेले दागिने, घर, मालमत्ता खरेदी करणे आणि गुंतवणूक करणे शुभ मानले जाते. या गोष्टी केल्यास तुमची संपत्ती वाढेल आणि ती तुमच्याकडे दीर्घकाळ टिकेल.

2. या योगात तुम्ही नवीन दुकान किंवा नवीन काम सुरू करू शकता. मान्यतेनुसार या कामांमध्ये तुम्हाला यश मिळू शकते. यामुळे तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होईल.

advertisement

3. गुरुपुष्यामृत योगामध्ये देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करावी. लक्ष्मी देवीला खीर, दुधापासून बनवलेली मिठाई आणि तुळशीची पाने, पंचामृत, गूळ इत्यादी भगवान विष्णूला अर्पण करा. कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. लक्ष्मी नारायणाच्या कृपेने तुमच्या संपत्तीत वाढ होईल.

घरातून अमंगळ-दोष दूर करण्याची हीच वेळ; पितृपक्षातील हे उपाय सार्थकी लागतील

advertisement

4. गुरुपुष्यामृत योग तयार झाल्यावर तुम्ही हळद देखील खरेदी करू शकता. भगवान विष्णू आणि देव गुरु बृहस्पती यांना हळद प्रिय आहे. यामुळे नशिबाची कामात साथ मिळेल.

5. गुरुपुष्यामृत योगामध्ये तुम्ही चांदीचे बनवलेले लक्ष्मी यंत्र किंवा चांदीचा कोणताही चौकोनी तुकडा खरेदी करावा. त्याची पूजा करा. तुमचे आर्थिक संकट दूर होईल. घरात सुख-समृद्धी नांदेल.

advertisement

यावेळी रात्रीच्या वेळी गुरुपुष्यामृत योग तयार होत आहे, अशा परिस्थितीत तुम्ही प्रथम खरेदी करण्यासाठी वस्तू निवडू शकता आणि गुरुपुष्यामृत योगाच्या वेळी त्याचे पैसे देऊ शकता. यामुळे तुमची खरेदी गुरुपुष्यामृत योगात होईल आणि तुम्हाला त्याचे फायदे मिळू शकतात.

गरिबीत गेलं इतकं आयुष्य! आता या राशींचे नशीब उजळणार; गुरू-शुक्राकडून खुशखबर-पैसा

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/अध्यात्म/
Guru Pushya Yoga 2024: गुरुपुष्यामृत आज! खरेदीचा दुर्मीळ शुभ योग; या 5 गोष्टी केल्यानं पालटेल नशीब
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल