Pitru Paksha 2024: घरातून अमंगळ-दोष दूर करण्याची हीच वेळ; पितृपक्षातील हे उपाय सार्थकी लागतील
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Pitru Paksha 2024: देव्हाऱ्यात कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या ठेवू नयेत हे वास्तुशास्त्रात सांगितले आहे. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्रकुमार शर्मा यांच्याकडून वास्तुच्या या नियमांबद्दल जाणून घेऊया.
Pitru Paksha 2024 : घरामध्ये आपण देव-देवतांचे फोटो किंवा मूर्ती देव्हाऱ्यात ठेवतो. देव्हाऱ्यात पूजेचे साहित्य वगैरे ठेवतोच, पण बरेच लोक आपल्या पूर्वजांचे फोटोही देव्हाऱ्यात ठेवतात. देव्हाऱ्यात पूर्वजांचे फोटो लावणे योग्य आहे का? असा प्रश्न पडतो. कदाचिक आपण मोठी चूक तर करत नाही ना? या प्रश्नांची उत्तरे आपल्याला वास्तुशास्त्रात मिळतात. कारण देव्हाऱ्याशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा त्यात उल्लेख आहे. देव्हाऱ्यात कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या ठेवू नयेत हे देखील सांगितले आहे. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्रकुमार शर्मा यांच्याकडून वास्तुच्या या नियमांबद्दल जाणून घेऊया.
देव्हाऱ्यात पूर्वजांचे फोटो लावणे योग्य की अयोग्य?
वास्तुशास्त्रानुसार, घरातील देव्हाऱ्यात पूर्वजांचे फोटो कधीही लावू नयेत. असे केल्याने आपल्याला देवतांच्या अवकृपेला सामोरं जावं लागू शकतं.
वास्तविक, पितरांचे स्थान देवी-देवतांच्या खाली मानले जाते. त्यामुळे देवाजवळ किंवा देवाशेजारी पूर्वजांचे फोटो/टाक ठेवल्यास ते अयोग्य ठरेल.
advertisement
- घरातील देव्हाऱ्यात पूर्वजांचे फोटो ठेवल्यास देव आणि पूर्वज समान आहेत असे वाटेल, जे अयोग्य होईल.
- घरातील देव्हाऱ्याच आपण पूर्वजांचे फोटो लावले असतील तर पितृदोष होऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या समस्या वाढू शकतात.
- देवाऱ्याच पूर्वजांचे फोटो ठेवल्यानं नकारात्मकता वाढते आणि घरावर संकटांचे ढग दाटून येतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 25, 2024 10:58 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Pitru Paksha 2024: घरातून अमंगळ-दोष दूर करण्याची हीच वेळ; पितृपक्षातील हे उपाय सार्थकी लागतील