October Horoscope: ऑक्टोबर महिन्यात या राशींचे उजळणार भाग्य! लेट पण थेट होणार मोठा लाभ, शुभ वार्ता

Last Updated:
October Horoscope Marathi: लवकरच सप्टेंबर महिना संपून ऑक्टोबर सुरू होत आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून ऑक्टोबर महिना खास असेल. कारण या महिन्यात महत्त्वाचे ग्रह राशी आणि नक्षत्र परिवर्तन करणार आहेत. याचा अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम सर्वच राशींवर होईल; पण तीन राशींसाठी ऑक्टोबर महिना खास असेल. या राशींना अनुकूल फळं मिळतील. या राशी कोणत्या ते सविस्तर जाणून घेऊ या. 
1/6
ऑक्टोबर महिन्यात सूर्य, बुध, मंगळ आणि शुक्र हे महत्त्वाचे ग्रह राशिपरिवर्तन करत आहेत. 10 ऑक्टोबरला बुध तूळ राशीत प्रवेश करील. 13 ऑक्टोबरला शुक्र मंगळाच्या वृश्चिक राशीत प्रवेश करील. त्यानंतर 17 ऑक्टोबरला सूर्य तूळ या त्याच्या नीच राशीत प्रवेश करील.

advertisement
2/6
20 ऑक्टोबरला मंगळ मिथुन राशीतून चंद्राच्या कर्क राशीत प्रवेश करील. ऑक्टोबर महिन्यात शुक्राच्या तूळ राशीत सूर्य-शुक्र युती होत शुक्रादित्य योग तयार होईल. हा योग ज्योतिषशास्त्रात अत्यंत शुभ मानला जातो. तसंच 3 ऑक्टोबर 2024 रोजी 12 वाजून 10 मिनिटांनी शनी पूर्वा भाद्रपदा नक्षत्रातून राहूच्या शततारका नक्षत्रात प्रवेश करील. या नक्षत्रात शनी 27 डिसेंबर 2024 पर्यंत असेल.

3/6
ही ग्रहस्थिती काही राशींसाठी अत्यंत अनुकूल असेल. या राशीच्या व्यक्तींची आर्थिक प्रगती होऊ शकते. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. तसंच अचानक धनलाभ होण्याचीदेखील शक्यता आहे.

4/6
वृषभ : या राशीच्या व्यक्तींसाठी ऑक्टोबर महिना लाभदायक असेल. तुमची आर्थिक प्रगती होईल. पदोन्नती, नवीन नोकरी मिळण्याची इच्छा पूर्ण होईल. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळेल. कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल.

5/6
सिंह : या राशीच्या व्यक्तींसाठी ऑक्टोबर महिना शुभ आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. मान-सन्मान वाढेल. कुटुंबातल्या सदस्यांसोबत चांगला वेळ घालवू शकाल. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील.

6/6
कन्या : ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी अनुकूल असेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. ऑफिसमध्ये चांगली कामगिरी कराल आणि त्यामुळे तुमचं कौतुक होईल. खासगी आयुष्य आनंददायी असेल. एखादं सरप्राइज मिळू शकतं. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
कन्या : ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी अनुकूल असेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. ऑफिसमध्ये चांगली कामगिरी कराल आणि त्यामुळे तुमचं कौतुक होईल. खासगी आयुष्य आनंददायी असेल. एखादं सरप्राइज मिळू शकतं.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement