सामुद्रिक शास्त्रानुसार पुरुषाचा उजव्या डोळ्याची पापणी फडफडल्यावर शुभ परिणाम प्राप्त होतात. त्यामुळे त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील, असे मानले जाते. त्यामुळे धनलाभ आणि पदोन्नतीचे योगही आहेत. तर स्त्रियांमध्ये असं होणं अशुभ लक्षण मानलं जातं. त्यांच्यासाठी हा वाईट संकेत असू शकतो. असे मानले जाते की, त्यामुळे स्त्रीने केलेले काम बिघडते किंवा जीवनात अडचणी येऊ लागतात.
advertisement
आज त्रिपुष्कर योग, या 4 राशींचा होईल भाग्योदय, कसा असेल 19 डिसेंबरचा दिवस?
सामुद्रिक शास्त्रात सांगितले आहे की, जर एखाद्या स्त्रीच्या डाव्या डोळ्याची पापणी फडफडत असेल तर हे त्या स्त्रीसाठी शुभ लक्षण आहे. असे म्हटले जाते की ज्या महिलेचा डावा डोळा फडफडतो त्यांना चांगले पैसे मिळतात. यासोबतच जर एखाद्या पुरुषाची डावा डोळा फडफडला तर त्या व्यक्तीला इजा होण्याची शक्यता असते.
वैज्ञानिक कारण -
वैज्ञानिक कारणांनुसार, डोळ्यांच्या पापण्या फडफडणे हे स्नायूंमध्ये काही प्रकारच्या तणावामुळे होते. जसे की वेळेवर पुरेशी झोप न मिळणे, टेन्शन घेणे, जास्त थकणे किंवा लॅपटॉपवर जास्त वेळ काम करणे यामुळेही पापण्या फडफडत असतात.
या जन्मतारखांच्या मुलींमध्ये उपजत असतो नेतृत्व गुण; अधिकारी बनून नाव कमावतात
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)