धनाची देवी लक्ष्मीच्या आशीर्वादानेच व्यक्तीला जीवनात धन, संपत्ती, ऐश्वर्य व वैभव प्राप्त होतं, अशी मान्यता आहे. ज्या घरांवर किंवा व्यक्तींवर लक्ष्मीची कृपा नसते त्यांना श्रीहीन म्हणतात. धार्मिक ग्रंथांनुसार, लक्ष्मी मातेचा घरात प्रवेश करण्याचा विशिष्ट शुभ काळ असतो. अशा वेळी काही गोष्टींची विशेष काळजी घेतली तर त्या व्यक्तीला आयुष्यात कधीही आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागत नाही.
advertisement
लक्ष्मी माता घरात केव्हा येते -
ज्योतिषशास्त्रानुसार लक्ष्मी माता घरात कोणत्या वेळी प्रवेश करते, हा प्रश्न अनेकांना पडतो. काहींच्या मते, ती सकाळी घरात येते, तर काहींच्या मते संध्याकाळी लक्ष्मीचं आगमन होतं. शास्त्रानुसार अक्षय्य तृतीयेच्या दिवशी माता लक्ष्मी कधीही घरात प्रवेश करू शकते. दिवाळीच्या रात्री देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते. धार्मिक मान्यतेनुसार संध्याकाळी लक्ष्मी घरात प्रवेश करते. ती फक्त अशाच घरांमध्ये प्रवेश करते जिथे तिला शुभ संकेत दिसतात.
त्रिगृही योगात बाप्पाचाही आशीर्वाद! या 6 राशींचे आता सुखाचे दिवस सुरू होणार
लक्ष्मी मातेच्या आगमनाची वेळ -
लक्ष्मी माता संध्याकाळी घरात प्रवेश करते. लक्ष्मी माता संध्याकाळी सात ते नऊ वाजण्याच्याकालावधीत घुबड या वाहनावर बसून प्रवास करते, अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे या वेळेते घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवावा. मुख्य दरवाजा बंद असल्यास लक्ष्मी माघारी निघून जाते, असं म्हणतात.
लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी काय करावं -
- लक्ष्मी मातेची तुमच्या घरावर कृपा राहावी असं वाटत असेल तर घराच्या प्रवेशद्वारावर तोरण लावा व तुपाचा दिवा लावा.
- ज्योतिषशास्त्रानुसार अंगणात उजव्या बाजूला एक तुळशीचं रोप लावा.
- यासोबतच घरात व देवखोलीत स्वच्छता ठेवा.
- घरातल्या मुख्य प्रवेशद्वारावर लक्ष्मी मातेचं पद-चिन्ह, स्वस्तिक व श्री यंत्राची स्थापना करा.
- शुक्रवारचं व्रत करा. या व्रतामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते. या दिवशी दान करा, सदाचारी राहा.
हेकेखोर की मनमिळावू? जन्मतारीख सांगेल कसा आहे समोरच्या व्यक्तीचा स्वभाव
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)