Chaturthi Horoscope: त्रिगृही योगात बाप्पाचाही आशीर्वाद! या 6 राशींचे आता सुखाचे दिवस सुरू होणार
- Published by:Ramesh Patil
- trending desk
- Written by:Chirag Daruwalla
Last Updated:
Rashi Bhavishya In Marathi: कसा असेल आजचा दिवस, कोणाला कशातून होईल लाभ? कोणाला कोणत्या समस्या देतील त्रास, कोणत्या गोष्टींची घ्यावी लागेल काळजी. पहा आजचं दैनिक राशीभविष्य (11 मे 2024)..
मेष (Aries) : सभोवतालचे वातावरण आनंदी असेल. घरात किंवा बाहेर चांगल्या बातम्या समजतील. जोडीदाराशी वाद होऊ शकतात. वाद वाढू नयेत यासाठी प्रकरण काळजीपूर्वक हाताळा. नवीन व्यवसाय सुरू केला तर त्यात यश मिळू शकेल. एखाद्या व्यक्तीला मदत करण्याची संधी मिळाली तर अवश्य करा. तीर्थक्षेत्री गरीब, गरजूंसाठी दान कराल. मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांसोबत धार्मिक कार्यक्रमाला किंवा धार्मिक स्थळी प्रवासाला जाण्याची योजना आखू शकता.Lucky Color : Pink
Lucky Number : 11
advertisement
वृषभ (Taurus) : दिवस आनंद वाढवणारा आहे. तुम्हाला एखादी चांगली प्रॉपर्टी मिळण्याची शक्यता आहे. विभक्त होण्याचा विचार असाल तर आज होऊ शकता. तुमच्याविषयी आदर आणि प्रतिष्ठा वाढेल. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना आणखी काही काळ अडचणींचा सामना करावा लागू शकतो. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. जुनं कर्ज फेडू शकाल. त्यामुळे तुमचा मानसिक ताण कमी होईल.Lucky Color : Orange
Lucky Number : 11
advertisement
मिथुन (Gemini) : एखादं विशिष्ट काम घाईत पूर्ण करण्यात व्यस्त राहाल. त्यामुळे कुटुंबाकडे तुमचे दुर्लक्ष होईल. पण तुम्ही काम पूर्ण करू शकाल. घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. यासाठी तुमचे पैसे खर्च होऊ शकतात. कुटुंबातील सदस्य पाहुण्यांच्या स्वागतात मग्न राहतील. कुटुंबातील लहान मुलांचा हट्ट तुम्ही पुरवाल. भाऊ आणि मुलाच्या वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत जागरूक रहावं लागेल. कारण तुम्हाला डोकेदुखी, ताप किंवा थकव्यासारखा त्रास होऊ शकतो.Lucky Color : Purple
Lucky Number : 9
advertisement
कर्क (Cancer) : दिवस विशेष फलदायी आहे. तुम्हाला तुमच्या मुलांच्या संगतीकडं लक्ष द्यावं लागेल. खर्च वाढल्याने तुम्ही चिंतेत असाल. पण तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल, अन्यथा तुमची बचत कमी होऊ शकते. यामुळे समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. कुटुंबातील सदस्याकडून एखादी चांगली बातमी समजेल. संध्याकाळी कुटुंबासह एखाद्या शुभ कार्यात सहभागी व्हाल. कोणंतही काम करण्यापूर्वी आई-वडिलांचा आशीर्वाद घेतला तर तुम्हाला कामात यश मिळेल.Lucky Color : White
Lucky Number : 7
advertisement
सिंह (Leo) : आरोग्यविषयक समस्या वाढतील. भूतकाळातील एखाद्या कृत्याची माफी मागावी लागू शकते. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या विवाहाबाबत निर्णय घ्यायचा असेल तर त्यापूर्वी ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या अन्यथा तुम्हाला कठोर शब्द ऐकावे लागू शकतात. विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. व्यवसायात रखडलेल्या योजना पुन्हा सुरू कराल. यामुळे तुम्हाला फायदा होईल. अविवाहितांना विवाहासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागेल.Lucky Color : Brown
Lucky Number : 5
advertisement
कन्या (Virgo) : दिवस समस्या वाढवणारा आहे. कार्यक्षेत्रात अनुभवाचा फायदा होईल. तुमच्या सूचनांचे स्वागत होईल. अधिकाऱ्याशी वाद झाला तर त्यावेळी मौन बाळगा. तुम्ही तुमचे विचार कोणाशी शेअर केले तर ते तुमची थट्टा करतील. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. अडकलेले पैसे मिळाल्याने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. मुलांच्या भविष्य़ासाठी बचत करू शकाल.Lucky Color : Maroon
Lucky Number : 1
advertisement
तूळ (Libra) : दिवस आनंद आणि समृद्धी वाढवणारा असेल. स्वतःसाठी एखादी वस्तू खरेदी करण्याकरिता पैसे कराल. हे पाहून तुमच्या विरोधकांना तुमचा हेवा वाटेल. सासरकडील व्यक्तीला पैसे उधार दिले तर नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. अविवाहित व्यक्तींच्या जीवनात नवीन व्यक्ती प्रवेश करेल. शिक्षकांच्या सहकार्यामुळे विद्यार्थी कोणत्याही परीक्षेत चांगले यश मिळवतील. यामुळे कुटुंबाचा गौरव वाढेल. वडिलांना एखादा आजार असेल तर त्यांचा त्रास वाढू शकतो.Lucky Color : Lavender
Lucky Number : 3
advertisement
वृश्चिक (Scorpio) : दिवस मध्यम फलदायी आहे. व्यवसाय मंद गतीने चालत असेल तर त्यासाठी एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घ्या. हा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाल. लव्ह लाइफमध्ये तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या बोलण्याने प्रभावित व्हाल. जोडीदार जे म्हणेल ते तुम्ही कराल. पण यामुळे तुमच्याकडून एखादी चूक होऊ शकते. नातेवाईकांनी वेळेवर मदत न केल्याने तुमचे मन अस्वस्थ राहील.Lucky Color : Violet
Lucky Number : 10
advertisement
धनू (Sagittarius) : दिवस आर्थिक स्थिती मजबूत करणारा आहे. तुम्हाला अचानक आणि अनपेक्षित मोठी रक्कम मिळू शकते. विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. त्यामुळे ते उत्साही असतील. नोकरदार व्यक्तींना ऑफिसमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सामाजिक कार्यक्रमात उपस्थित राहाल. आईला दिलेले वचन पूर्ण करा अन्यथा ती तुमच्यावर रागावेल.Lucky Color : Burgundy
Lucky Number : 8
advertisement
मकर (Capricorn) : दिवस व्यस्त असेल. व्यवसायात रखडलेल्या कामांकडे लक्ष द्यावे लागेल आणि ती प्राधान्याने पूर्ण करावी लागतील तरच तुम्ही नफा मिळवू शकाल. सरकारी नोकरीशी संबंधित महिलांशी संवाद साधताना बोलण्यात गोडवा ठेवा. सासरकडील मंडळींकडून आर्थिक लाभ होऊ शकतो. निष्क्रिय लोकांसोबत वेळ घालवणं टाळा आणि कामावर लक्ष केंद्रित करा. व्यवसायात पैसे गुंतवल्यास ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.Lucky Color : Red
Lucky Number : 6
advertisement
कुंभ (Aquarius) : तुमची लोकप्रियता वाढेल. पण विरोधकांपासून सावध रहा. कारण ते तुमची प्रगती पाहून तुमचा व्देष करतील आणि तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. कोणतेही काम नशिबावर सोडू नका, नाहीतर नंतर अडचणीत याल. तुमच्या मुलाला नवीन नोकरी मिळाल्याने आनंदी असाल. कोणाशी आर्थिक व्यवहार करण्याचा विचार असेल तर सावधगिरी बाळगा. कारण तो तुम्हाला चुकीचा सल्ला देऊन अडचणीत आणू शकतो.Lucky Color : Blue
Lucky Number : 4
advertisement
मीन (Pisces) : दिवस इच्छापूर्तीचा आहे. दीर्घकाळापासून मनात असलेली वाहन किंवा मालमत्ता खरेदीची इच्छा पूर्ण होईल. घरी शुभ कार्याचे आयोजन करू शकता. यासाठी घरी नातेवाईक येतील. संध्याकाळचा वेळ कुटुंबासोबत मजेत घालवाल. त्यामुळे नात्यातील दुरावा कमी होईल. व्यवसायासाठी प्रवास करण्याचे नियोजन असेल तर अवश्य प्रवास करा, कारण तो तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. ऑफिसमध्ये कोणाचं बोलणं ऐकून लगेच प्रतिक्रिया देऊ नका, अन्यथा ती व्यक्ती तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकते.Lucky Color : Green
Lucky Number : 2