मुंगूसाचे निवासस्थान - वास्तुशास्त्रानुसार मुंगूस ज्या जमिनीवर छिद्र पाडतो. ती भूमी मानवासाठी सर्वोत्तम मानली जाते. या प्रकारच्या जमिनीवर घर बांधणाऱ्या व्यक्तीला भरपूर संपत्ती तर मिळतेच शिवाय त्याची प्रतिष्ठाही वाढते. मुंगूस हे सूर्याचे प्रतीक मानले जाते. ज्याचे राहूशी वैर आहे. या भूमीवर नकारात्मक शक्तीही वावरत नाहीत, असे मानले जाते.
घोड्याचा तबेला- वास्तुशास्त्रानुसार ज्या जमिनीवर घोड्याचे स्थिरस्थान असते ती जमीन घर बांधण्यासाठी देखील शुभ मानली जाते. या जमिनीवर घर बांधणाऱ्या व्यक्तीला आरोग्यविषयक समस्या येत नाहीत. यासोबतच त्यांना आयुष्यभर पैशाची कमतरता भासत नाही. घोडा हा सूर्याचे प्रतीक मानला जातो. ज्या लोकांची राशी मेष आणि धनु आहे त्यांच्यासाठी ही भूमी उत्तम मानली जाते.
advertisement
गोशाळा- वास्तुशास्त्रानुसार ज्या जमिनीवर पूर्वी कधी गोशाळा होती, त्या जागेवर घर बांधणे खूप शुभ मानले जाते. लाल रंगाची गाय सूर्याचे प्रतीक मानली जाते आणि पिवळ्या रंगाची गाय बृहस्पतिचे प्रतीक मानली जाते. ज्या जमिनीवर गाय गवत खाते किंवा चरायला जाते, त्या जमिनीवर घर बांधू नये, असे मानले जाते.
बुधादित्य राजयोग! जानेवारीच्या उत्तरार्धात या राशींचा बोलबाला; शत्रुंचा जळफळाट
मधमाशीचे पोळे- वास्तुशास्त्रानुसार मधमाशा ज्या ठिकाणी राहतात त्या जागेवर घर बांधल्यास आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते. कारण मध हे देव गुरु बृहस्पतिचे प्रतीक मानले जाते आणि बृहस्पति हा धनाचा कारक आहे. त्यामुळे ही भूमी खूप फायदेशीर मानली जाते.
अपवित्र जमीन- वास्तुशास्त्रानुसार ज्या भूमीवर डुक्कर, कुत्रे किंवा कोल्हे यांसारखे प्राणी रोज बसतात, त्या जमिनीवर घर बांधणे अशुभ मानले जाते. याशिवाय ज्या भूमीतून साप किंवा विंचू बाहेर पडतात, ती जमीनही माणसांना राहण्यासाठी योग्य मानली जात नाही. अशा जमिनीवर घर बांधल्यास व्यक्तीला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
कसं होईल, काय होईल! शनिदेव सगळं जुळवून आणणार; या राशी मोठा टप्पा गाठणार
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)