देवघर : शनी ग्रहाला न्यायदेवता मानलं जातं. हा ग्रह प्रत्येक राशीच्या व्यक्तींना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. त्यामुळे जर एखाद्या राशीवर शनीची वाईट दृष्टी पडली तर त्या राशीच्या व्यक्तींचा वाईट काळ सुरू झालाच म्हणून समजायचं. त्या व्यक्तींच्या सर्व कामात अडथळे यायला सुरूवात होते, त्यांची सर्व कामंं बिघडतात. तर, याउलट ज्या राशींवर शनीची कृपादृष्टी असते त्यांना विचारापलिकडचं सुख मिळतं.
advertisement
आता शनी पुढच्या वर्षापर्यंत आपल्याच राशीत म्हणजे कुंभमध्ये राहणार आहे. त्यामुळे यंदा शनीचं राशीपरिवर्तन होणार नाही, मात्र स्थानपरिवर्तन होईल. ज्याचा सर्व 12 राशींवर परिणाम दिसून येईल. ज्योतिषांकडून जाणून घेऊया शनीचं स्थानपरिवर्तन कधी होईल.
वर्षातली पहिली पौर्णिमा येतेय, अजिबात चुकवू नका; काय करायचं वाचा, सुखच सुख मिळेल!
झारखंडच्या देवघरचे ज्योतिषी आचार्य पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनी कुंभ राशीत स्थानपरिवर्तन करणार नाही. मात्र काहीवेळासाठी दिसेनासा होणार आहे. म्हणजेच शनी कुंभ राशीत काही दिवसांसाठी अदृश्य असेल. हा काळ आहे 11 फेब्रुवारी ते 18 मार्च. एखाद्या व्यक्तीच्या राशीला शनी असणं अत्यंत घातक मानलं जातं. त्यात जर शनी दिसेनासा झाला तर ते आणखी खतरनाक ठरतं. आता याचा कोणत्या राशींवर नकारात्मक प्रभाव पडणार, पाहूया.
Astrology: 22 जानेवारीला झाला बाळाचा जन्म? आता No tension, घरी सुख आलं!
कन्या : आपल्यावर शनीचा नकारात्मक प्रभाव पडणार आहे. त्याचा सर्वाधिक परिणाम आपल्या आरोग्यावर होईल. पोटदुखीने आपण त्रस्त व्हाल. त्याचा कामावर परिणाम दिसेल. नव्या नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या शोधात असाल, तर आणखी काही काळ वाट पाहावी लागेल. ज्यामुळे मानसिक तणाव येईल. शिवाय जोडीदारासोबत सतत लहान लहान गोष्टींवरून खटके उडतील. त्यामुळे शक्य होईल तेवढं मन एकाग्र ठेवण्याचा प्रयत्न करा.
कुंभ : शनी अदृश्य होताच आपला वाईट काळ सुरू होईल. कारण वर्षभर शनी आपल्याच राशीत ठाण मांडून असेल. शिवाय आपल्यावर आधीच साडेसाती सुरू आहे, त्यात शनी दिसेनासा होणं घातक ठरेल. त्यामुळे जरा जपूनच. वाहन चालवताना काळजी घ्या. नाहीतर भीषण अपघात होऊ शकतो. स्वत:हून कोणाशी वाद घालू नका. कारण आपल्याभोवती कोर्ट-कचेरीच्या फेऱ्या सुरू होऊ शकतात.
मीन : आपल्यावर शनीची वाईट दृष्टी पडणार आहे. त्यामुळे व्यवसायात मोठं नुकसान होईल. गुंतवणूकीचा विचार तर अजिबात करू नका. त्यातून तुम्ही कर्जात बुडू शकता. कोणाला पैसे उधारही देऊ नका. शिवाय कोणत्याच कामात घाई-घाई करू नका. कारण याच काळात तुम्हाला फार मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागणार आहे. शिवाय कुटुंबातील एका सदस्याची तब्येत बिघडू शकते. त्यामुळे तुम्ही प्रचंड तणावात राहाल.
उपाय काय करावा?
या तीनही राशीच्या व्यक्तींनी हनुमान चालीसेचं पठण करावं. ते फायदेशीर ठरेल. त्यामुळे अडचणी येणं थांबणार नाही, मात्र त्यांवर मात करण्याचं बळ आपल्याला मिळेल.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो… या लिंकवर क्लिक करा