वर्षातली पहिली पौर्णिमा येतेय, अजिबात चुकवू नका; काय करायचं वाचा, सुखच सुख मिळेल!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
हा संपूर्ण महिना शुभ असल्याने अर्थातच या महिन्याची पौर्णिमासुद्धा अत्यंत खास असते. या पौर्णिमेला दान केल्याने दुप्पट पुण्य मिळतं.
दुर्गेश सिंह राजपूत, प्रतिनिधी
नर्मदापुरम : ज्योतिषशास्त्रानुसार पौष महिना हा भगवान सूर्याचा महिना मानला जातो. त्यामुळे या महिन्यात सूर्यदेवांची विधिवत पूजा केल्याने व्यक्तीला सर्व पापांपासून मुक्ती मिळते, असं म्हणतात. शिवाय या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीची पूजा करण्याचाही सल्ला दिला जातो. हा संपूर्ण महिना शुभ असल्याने अर्थातच या महिन्याची पौर्णिमासुद्धा अत्यंत खास असते. या पौर्णिमेला दान केल्याने दुप्पट पुण्य मिळतं.
advertisement
धार्मिक मान्यतेनुसार, पौष पौर्णिमेच्या दिवशी गंगा किंवा नर्मदा नदीत स्नान करून भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीची विधीवत पूजा केल्याने व्यक्तीला आपल्या शुभकार्याचं फळ मिळतं, अशी मान्यता आहे. यामुळे सर्व दुःखांपासून तिची सुटका होते.
ज्योतिषी पंडित पंकज पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, पौर्णिमेच्या दिवशी धार्मिक नियमांचं पालन करून पवित्र मंत्रांच्या पठणासह विधीवत पूजा केली जाते. त्यामुळे भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळतो. आज आपण त्यांना प्रसन्न करण्यासाठी काही खास मंत्र पाहूया.
advertisement
भगवान विष्णूंसाठी करा 'हे' मंत्रजप.
1. ॐ नमोः नारायणाय।।
2. ॐ नमोः भगवते वासुदेवाय।।
3. ॐ श्री विष्णवे च विद्महे वासुदेवाय धीमहि। तन्नो विष्णुः प्रचोदयात्।।
4. मङ्गलम् भगवान विष्णुः, मङ्गलम् गरुणध्वजः।मङ्गलम् पुण्डरी काक्षः, मङ्गलाय तनो हरिः।।
advertisement
5. शान्ताकारम् भुजगशयनम् पद्मनाभम् सुरेशम्विश्वाधारम् गगनसदृशम् मेघवर्णम् शुभाङ्गम्।
6. लक्ष्मीकान्तम् कमलनयनम् योगिभिर्ध्यानगम्यम्वन्दे विष्णुम् भवभयहरम् सर्वलोकैकनाथम्।।
लक्ष्मी देवीसाठी 'या' मंत्रांचा करा जप.
1. ॐ ह्रीं श्रीं लक्ष्मीभयो नमः।।
2. ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद। ॐ श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मयै नम:।।
3. ॐ श्री महालक्ष्म्यै च विद्महे विष्णु पत्न्यै च धीमहि। तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ॐ।।
advertisement
पौष पौर्णिमेची तारीख आणि शुभ मुहूर्त.
पौर्णिमा तिथीची सुरुवात 24 जानेवारीच्या रात्री 09 वाजून 49 मिनिटांपासून होईल. तर, दुसऱ्या दिवशी 11 वाजून 23 मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होईल. त्यामुळे 25 जानेवारीला म्हणजेच गुरुवारी पौर्णिमा साजरी केली जाईल.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा
Location :
Madhya Pradesh
First Published :
January 23, 2024 1:48 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
वर्षातली पहिली पौर्णिमा येतेय, अजिबात चुकवू नका; काय करायचं वाचा, सुखच सुख मिळेल!