Astrology: 22 जानेवारीला झाला बाळाचा जन्म? आता No tension, घरी सुख आलं!

Last Updated:

22 जानेवारीला सर्वसिद्धी अमृत योग निर्माण झाल्यामुळे या दिवशी जन्मलेल्या बाळांचं नाव श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेसह सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिलं जाईल.

हे बाळ श्रीरामांप्रमाणे धाडसी आणि पराक्रमी असेल.
हे बाळ श्रीरामांप्रमाणे धाडसी आणि पराक्रमी असेल.
विनय अग्रिहोत्री, प्रतिनिधी
भोपाळ : हिंदू ज्योतिषशास्त्रानुसार, 22 जानेवारी 2024 हा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण होता. या दिवशी ग्रह, तारे अत्यंत अनुकूल स्थितीत होते. म्हणूनच याच दिवशी अयोध्येच्या भव्य मंदिरात श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. ज्योतिषांनी त्यासाठी अतिशय दुर्मीळ असा मुहूर्त काढला होता. त्यामुळे या दिवशी जन्मणारं बाळसुद्धा प्रचंड सुख घेऊन आलं आहे. या बाळाचं नामकरण ज्योतिषशास्त्रानुसारच करण्याचा सल्ला ज्योतिषांनी दिला आहे.
advertisement
ज्योतिषी पंडित सत्यम शास्त्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 जानेवारीला जन्मलेलं बाळ श्रीरामांप्रमाणे धाडसी आणि पराक्रमी असेल. त्याला पदोपदी त्याचं भाग्य साथ देईल. मुख्य म्हणजे या दिवशी बाळाचा जन्म झाला म्हणजे आपल्या घरी साक्षात प्रभू श्रीरामांचं आगमन झालं, त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळाला हे समजून जावं, असं ज्योतिषी म्हणाले.
advertisement
ज्याेतिषांनी सांगितलं की, या बाळाचं नामकरण शास्त्रानुसारच करावं. ज्या बाळांचा जन्म 22 जानेवारीच्या पहाटे 3 वाजून 51 मिनिटांपासून सकाळी 10 वाजून 05 मिनिटांदरम्यान झाला असेल, तर त्यांच्या कुंडलीत मृग नक्षत्र प्रथम चरणात असेल आणि त्यांचं नाव 'वे' अक्षरापासून सुरू होईल. ज्या बाळांचा जन्म सकाळी 10 वाजून 05 मिनिटांपासून दुपारी 4 वाजून 21 मिनिटांच्या दरम्यान झाला असेल त्यांचं नाव 'वो' अक्षरापासून सुरू होईल. या बाळांची रास वृषभ असेल. ज्या बाळांचा जन्म दुपारी 4 वाजून 21 मिनिटांपासून ते रात्री 11:00 वाजण्याच्या सुमारास झाला असेल त्यांच्या नावाची सुरूवात 'का' अक्षरापासून होईल. तर, रात्री 11:00 वाजल्यानंतर जन्मलेल्या बाळांची रास मिथुन असेल.
advertisement
विशेष म्हणजे 22 जानेवारीला सर्वसिद्धी अमृत योग निर्माण झाल्यामुळे या दिवशी जन्मलेल्या बाळांचं नाव श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेसह सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिलं जाईल. या बाळाच्या आगमनामुळे आपली सर्व दु:ख संपून आयुष्यात सुखच सुख येईल.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा
मराठी बातम्या/अध्यात्म/
Astrology: 22 जानेवारीला झाला बाळाचा जन्म? आता No tension, घरी सुख आलं!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement