पंढरीतून भक्ताच्या भेटीसाठी देव आळंदीत
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्यावतीने 2014 पासून विठ्ठलाच्या पादुका आळंदीकडे पायी वारी करत नेल्या जातात. दरवर्षी विठ्ठलाच्या पादुका तसेच संत नामदेवराय आणि संत पुंडलिकांच्या पादुका कार्तिक शुद्ध एकादशी झाल्यानंतर पौर्णिमेला पंढरपुरातून पायी प्रस्थान करतात. रोज 35 ते 40 किलोमिटर अंतर कापत अष्टमी दिवशी आळंदी येथे पोहोचतात. 700 वर्षांपूर्वी विठ्ठलाने आपला लाडका भक्त ज्ञानेश्वर माऊलींना यापुढे दरवर्षी संजीवन समाधी सोहळ्याला आळंदीस येईल असा शब्द दिला होता. त्यामुळे देवाच्या पादुकांसह हजारो भाविकांनी आळंदीकडे प्रस्थान ठेवले. श्री विठ्ठलाची पालखी आळंदीत मुक्कामी असते. या काळात देव आणि भक्ताच्या भेटीचा सोहळा होतो, अशी माहिती विश्वस्त योगी निरंजन महाराज यांनी दिली.
advertisement
संत ज्ञानेश्वरांनी आळंदीतील सिद्धेश्वर मंदिरातच का घेतली समाधी? पाहा काय आहे कारण?
कार्तिक महिन्यात आळंदी यात्रेचे महत्त्व
पंढरपूर येथील कार्तिकी यात्रा तीन दिवसांची असते, तर आळंदी येथील यात्रेचा कालावधी आठ दिवसांचा असतो. त्यामुळे येथे भाविकांचा प्रचंड ओघ असतो. भाविकांच्या भक्ती भावामध्ये ही यात्रा साजरी होते. त्यामुळे सर्व वारकरी माऊलींच्या भक्तीत तल्लीन होणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक आळंदीत दाखल झालेत. पवित्र इंद्रायणी नदीत स्नान करून भाविकांनी माऊलीच्या दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. भाविकांनी आळंदीत ग्रंथ, गळ्यातील तुळशीची माळ खरेदी करण्यावर भर दिला. राहुट्यांमध्ये भाविकांचा हरिनामाचा अखंड गजर सुरु आहे.