ऋषिकेश : ज्योतिषशास्त्रात 12 राशींसाठी नवरत्नांचं महत्त्व सांगितलेलं आहे. या नवरत्नांचे 84 उपरत्न आहेत. प्रत्येक व्यक्तीला आपल्या राशीनुसार रत्न परिधान करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे कुंडलीतली साडेसाती, राहू, केतूची महादशा दूर होती. शिवाय योग्य रत्न परिधान केल्यास व्यक्तीचं नशीब पालटायलाही वेळ लागत नाही. परंतु अयोग्य रत्न घातल्यास राजाचा रंक कधी होतो हेसुद्धा कळत नाही. आज आपण माणिक रत्नाची माहिती पाहणार आहोत.
advertisement
दिवसभर आपल्याला आकाशात दिसणारा तेजस्वी रत्न म्हणजे सूर्य. कुंडलीत सूर्याचं स्थान भक्कम असल्यास नशीब उघडलंच म्हणून समजायचं. त्यासाठी माणिक रत्न वापरण्याचा सल्ला दिला जातो. उत्तराखंडच्या हिमालयीन जेम्स अँड हँडीक्राफ्ट दुकानाचे मालक आणि ज्योतिषी अशोक यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येकाने आपल्या राशीनुसार योग्य रत्न परिधान करावं. त्यामुळे त्या व्यक्तीच्या आयुष्यातली सर्व नकारात्मक ऊर्जा हळूहळू दूर होते आणि तिचा आत्मविश्वास वाढतो.
शनी कुंभमध्ये आता वर्षभर मुक्कामी; घाबरू नका, 4 राशीच्या व्यक्तींना मिळणार सर्वकाही!
माणिक रत्नाचे फायदे
अशोक यांनी सांगितलं की, माणिकाचा रंग लाल, गुलाबी असतो. त्यामुळे मेष, मिथुन, कन्या, वृश्चिक, धनू आणि मीन राशीच्या व्यक्ती हे रत्न परिधान करू शकतात. कुंडलीतलं सूर्याचं स्थान भक्कम होण्यासाठीच हे रत्न परिधान केलं जातं. म्हणूनच ते अत्यंत शक्तिशाली मानतात. त्यामुळे आयुष्यात आनंद येतो आणि प्रगतीचे अनेक मार्ग खुले होतात.
शनी होणार अदृश्य! 'या' 3 राशींचं काही खरं नाही, वेळीच उपाय केलात तर मिळेल...
कसं परिधान करावं माणिक?
माणिकचं पेंडंट नाही, तर माळ परिधान करावी. त्यात तांब्याची किंवा सोन्याची तार असेल तर उत्तम. सूर्योदयानंतर आंघोळ करून आपण हे रत्न परिधान करू शकता. मात्र त्यापूर्वी त्याला गायीच्या दुधाने आणि गंगेच्या पाण्याने स्वच्छ करावं. त्यानंतर सूर्यदेवाची प्रार्थना करूनच हे रत्न परिधान करावं. तर त्याचा लाभ आपल्याला मिळतो.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो… या लिंकवर क्लिक करा