कुलदीप यादवला बर्थडे गिफ्ट
साऊथ अफ्रिकेचा डाव सुरू असताना एक घटना समोर आली. टीम इंडियाच्या बॉलर्सने साऊथ अफ्रिकेच्या बॅटिंग फास लावला होता. अॅडम मार्करम आऊट झाल्यावर टीम इंडियाने सुटकेचा श्वास सोडला होता. अशातच गंभीरने तिथंच कुलदीप यादवला बर्थडे गिफ्ट देण्याचं ठरवलं. गंभीरने 19 व्या ओव्हरमध्ये फिल्डिंग कोच टी दुलीपला बोलवलं अन् कानात मेसेज सांगितला. त्यानंतर दुलीप तातडीने बेंचवर असलेल्या संजू सॅमसनकडे गेले अन् गंभीरचा मेसेज पोहोचवायला सांगितलं.
advertisement
सूर्याने कुलदीपला ओव्हर दिली अन्...
दुलीप यांचा मेसेज घेऊन संजू मैदानात आला अन् अनपेक्षितरित्या कॅप्टन सूर्यकुमार यादव याने कुलदीप यादवला अखेरची ओव्हर दिली. 20 व्या ओव्हरला स्पिनर्स लावणं ही धोक्याची घंटा असते. परंतू गंभीरला कुलदीपवर पूर्ण विश्वास होता. गंभीरच्या सांगण्यावरून सूर्याने कुलदीपला ओव्हर दिली अन् त्याच ओव्हरमध्ये कुलदीपने दोन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.
पाहा Video
CLIP OF THE DAY
Kuldeep Yadav Got his Birthday Gift By Indian Head Coach Gautam Gambhir, GG told Duleep To bowl Kuldeep Next Over which is Last over of the Game, And Beautifully Kuldeep Yadav Takes Two Wickets on his Birthday to make it more memorable . pic.twitter.com/M99wnPQN6J
advertisement— Bemba Tavuma
