लुईस सुआरेझला दिला चकवा
मेस्सीच्या स्वागतासाठी मैदान खचाखच भरले असताना, 60 लहान मुलांना मेस्सीसोबत मैदानात फुटबॉल खेळण्याची संधी मिळाली. याच दरम्यान एक क्षण कॅमेरात कैद झाला, ज्यामुळे उपस्थित स्टार खेळाडूही थक्क झाले. 13 वर्षांची तनिष्का कवडे हिच्या पायाजवळ बॉल आला. तिने कोणतीही भीती न बाळगता, क्षणात निर्णय घेऊन थेट लुईस सुआरेझला 'नटमेग' (चकवा) दिला. सुआरेझला देखील पोरीच्या किकचं कौतूक वाटलं.
advertisement
तनिष्कासाठी अविस्मरणीय क्षण
बॉल पायाखालून गेल्यावर सुआरेझ लगेच प्रतिक्रिया दिली. त्याला स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. त्याचा चेहरा आश्चर्यचकित झाला. तर मेस्सीने देखील तिच्या किकला दाद दिली. हा तनिष्कासाठी अविस्मरणीय क्षण ठरला. तिने नंतर सांगितलं की, "त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी फक्त आश्चर्याने माझ्याकडे पाहिले. माझे स्वप्न रोनाल्डोला भेटण्याचे होतं, पण मी मेस्सीला भेटले, ते देखील माझ्यासाठी एक मोठं स्वप्न होतं, असंही ती म्हणाली.
मेस्सीला पाहताच रडायला सुरुवात
तनिष्काला मेस्सीला प्रत्यक्ष भेटण्याची संधीही मिळाली. तिने आपल्या हातावर मेस्सीचं नाव लिहिलं होतं, जे पाहून मेस्सी तिच्याकडे पाहून हसला. या दौऱ्यात सहभागी झालेल्या इतर मुलींसाठीही हे क्षण खूप भावनिक ठरले. 13 वर्षीय तनिष्काने तर मेस्सीला पाहताच रडायला सुरुवात केली. मेस्सीला पहिल्यांदा पाहण्याचा हा क्षण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता आणि स्वप्नवत वाटत होता, असं तिने टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं.
दोन हजार रुपयांची शिष्यवृत्ती
मेस्सीसोबत मैदानात असलेल्या मुली 'प्रोजेक्ट महादेवा' नावाच्या युवा फुटबॉल प्रशिक्षण कार्यक्रमाचा भाग आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेस्सीच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. निवड झालेल्या 60 मुलांना पुढील पाच वर्षांसाठी संरचित प्रशिक्षण आणि मूलभूत गरजांसाठी मासिक दोन हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.
कोण आहे लुईस?
दरम्यान, लुईस हा मेस्सीचा इंटर मियामीमधील संघसहकारी आणि उरुग्वेचा अनुभवी खेळाडू आहे. तर रोड्रिगो डी पॉल अर्जेंटिना राष्ट्रीय संघाचा खेळाडू असून, मेस्सीसोबत फिफा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाचा तो सदस्य आहे.
