रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात केरलच्या कर्णधार सचिन बेबीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. विदर्भच्या फलंदाजांनी पहिल्याच डावात 379 धावा फटकावत मजबूत सुरुवात केली. दानिश मालिवरने शानदार 153 धावा केल्या, तर करुण नायरनेही 86 धावांची महत्त्वाची खेळी साकारली. केरळकडू एम.डी. निधीश आणि एडन ऍपल टॉम यांनी प्रत्येकी 3-3 गडी बाद केले.
advertisement
चॅम्पियन्स ट्रॉफीवर सर्वात बोल्ड भविष्यवाणी, Final मॅच भारत १ धावाने जिंकणार...
केरळने पहिल्या डावात चांगला प्रतिकार करत 342 धावा केल्या. कर्णधार सचिन बेबी 98 धावांवर बाद झाला. विदर्भच्या गोलंदाजांमध्ये दर्शन नालकंडे, हर्श दुबे आणि पार्थ रेखाडे यांनी प्रत्येकी 3-3 बळी घेतले.
करुण नायरचा धमाका आणि विदर्भचा ऐतिहासिक विजय
दुसऱ्या डावात विदर्भच्या फलंदाजांनी पुन्हा दमदार कामगिरी करत सामना आपल्याकडे खेचला. करुण नायरने शानदार शतक ठोकत विदर्भच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. धावांचा डोंगर रचूनही करुण नायरला टीम इंडियामध्ये स्थान मिळवता आले नसेल पण त्याने त्याच्या विदर्भ संघाला रणजी चॅम्पियन बनवले. पाचव्या दिवशी खेळ थांबला तेव्हा विदर्भचा स्कोर 9 बाद 375 होता आणि त्याचबरोबर विदर्भने रणजी ट्रॉफीच्या इतिहासात आणखी एक सुवर्ण क्षण जोडला. या विजयासह विदर्भने पुन्हा एकदा देशातील सर्वोत्तम संघांपैकी एक म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.