बरेच यूजर्स अधिकृत व्हॉट्सॲप वापरण्याऐवजी थर्ड-पार्टी ॲप्स वापरतात. अशा परिस्थितीत व्हॉट्सॲप डेल्टा, जीबी वॉट्सॲप आणि व्हॉट्सॲप प्लस या नावांनी अनेक ॲप उपलब्ध आहेत. मात्र या ॲप्सच्या वापरावर कंपनीने बंदी घातली आहे. तुम्ही हे थर्ड पार्टी ॲप्स वापरल्यास तुमचे अकाउंट बंद होऊ शकते.
Instagram Reels वर 1 मिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? जाणून व्हाल चकीत
advertisement
दुसऱ्याची ओळख वापरणे
तुम्ही दुसऱ्याचे नाव, प्रोफाईल फोटो आणि ओळख घेऊन मेसेज करत असलात तरीही तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट बंद होऊ शकते. असे करणे हे व्हॉट्सॲपच्या कम्युनिटी गाइडलाइन्स तत्त्वांचे उल्लंघन मानले जाते. कोणत्याही सेलिब्रिटी, ब्रँड किंवा संस्थेची ओळख पटल्यास, तुमचे अकाउंट देखील बंद केले जाऊ शकते.
कॉन्टॅक्ट लिस्टशिवाय नंबरवर मेसेज पाठवणे
तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नसलेल्या लोकांना दिवसभर मेसेज करत असाल तर तुमचे मेसेज स्पॅम मानले जाऊ शकतात. अशा परिस्थितीत तुमचे अकाउंट बंद केले जाईल.
WhatsApp चॅटही होऊ शकते लीक? मार्क झुकरबर्गने वाढवलं यूझर्सचं टेन्शन
रिपोर्ट केल्यानंतर अकाउंट बंद केले जाईल
अनेक यूझर्सनी तुमचे अकाउंट रिपोर्ट केले असेल, तर कंपनी तुमच्यावर कारवाई करू शकते. कंपनी तुमचे अकाउंट बंद करू शकते. तुम्हाला रिपोर्ट करणारी व्यक्ती तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टचा भाग आहे की नाही हे महत्त्वाचे नाही.
एखाद्याला त्रास देण्यासाठी कारवाई केली जाईल
तुम्ही एखाद्याला त्रास देण्यासाठी किंवा धमकी देण्यासाठी मेसेज पाठवल्यास, तुमचे अकाउंट बंद केले जाईल. याशिवाय, प्रक्षोभक, द्वेषयुक्त किंवा आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याबद्दल देखील तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते.