WhatsApp चॅटही होऊ शकते लीक? मार्क झुकरबर्गने वाढवलं यूझर्सचं टेन्शन

Last Updated:

मार्क झुकरबर्गच्या एका विधानामुळे लाखो व्हॉट्सॲप यूझर्सचा तणाव वाढला आहे. ज्यामध्ये मेटा सीईओने व्हॉट्सॲप चॅट्सच्या एंड-टू-एंड एन्क्रिप्शनबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. सरकारी एजन्सींच्या युजर चॅटबाबत झुकेरबर्गने मोठी गोष्ट सांगितली आहे.

मार्क झुकेरबर्ग
मार्क झुकेरबर्ग
मुंबई : WhatsApp हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग ॲप आहे. जगभरात त्याचे 295 कोटींहून अधिक डेली अॅक्टिव्ह यूझर्स आहेत. WhatsApp हे सर्वात सुरक्षित मेसेजिंग ॲप मानले जाते. याचे मुख्य कारण म्हणजे त्याचे एंड-टू-एंड एन्क्रिप्शन. हे प्रायव्हसी फीचर यूझर्सच्या पर्सनल चॅट लीक होण्यापासून संरक्षण करते. कंपनीचा दावा आहे की, व्हॉट्सॲपवर केलेल्या चॅट्सचा अॅक्सेस फक्त सेंडर आणि रिसिव्हरजवळ आहे. मेटा सीईओ मार्क झुकेरबर्गने व्हॉट्सॲपच्या प्रायव्हसी संदर्भात एक विधान जारी केले आहे, ज्यामुळे जगभरातील लाखो यूझर्ससाठी तणाव निर्माण झाला आहे.
मार्क झुकरबर्गने केले चकीत
मार्क झुकेरबर्गने शनिवारी, 11 जानेवारी 2025 रोजी एका निवेदनात म्हटले आहे की, CIA किंवा सेंट्रल इंटेलिजेंस एजन्सीसारखे अमेरिकन अधिकारी, यूझर्सच्या डिव्हाइसवर प्रत्यक्ष प्रवेश करत असल्यास ते WhatsApp मेसेज चॅट वाचू शकतात. व्हॉट्सॲपचे एंड-टू-एंड एन्क्रिप्शन यूझर्सच्या गोपनीयतेची पूर्ण काळजी घेत असल्याचे त्यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. तसंच, जर एखाद्या एजन्सीला यूझर्सच्या डिव्हाइसवर प्रवेश असेल तर त्याद्वारे केलेल्या चॅट्समध्ये प्रवेश केला जाऊ शकतो.
advertisement
The Joe Rogan Experience या खाजगी चॅनलवर केलेल्या पॉडकास्टमध्ये विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मार्क झुकरबर्ग म्हणाले की, व्हॉट्सॲपचे एन्क्रिप्शन फीचर मेटा सर्व्हरसाठी आहे. यामध्ये, सर्व्हरद्वारे संदेश, फाइल्स इत्यादीद्वारे केले जाणारे कम्युनिकेशन सुरक्षित ठेवले जाते यूझर्सचे डिव्हाइस नाही. यूझर्सचे डिव्हाइस कोणत्याही सरकारी एजन्सीच्या हाती लागले. तर ते या डिव्हाइसद्वारे केलेल्या चॅट्समध्ये अॅक्सेस करू शकतात.
advertisement
हा प्रश्न मार्क झुकेरबर्गला नुकत्याच समोर आलेल्या एका वादामुळे विचारण्यात आला होता, ज्यामध्ये पत्रकार टकर कार्लसन यांनी अमेरिकन गुप्तचर संस्था NSA आणि CIA वर त्यांच्या आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्यात झालेल्या मुलाखतीच्या प्रायव्हेट मेसेजला अॅक्सेस केल्याचा आरोप केला होता. कार्लसनने दावा केला आहे की या एजन्सींनी त्याच्या योजनेचा भंग केला.
advertisement
गोपनीयता राखली जाईल
मेटा सीईओने असेही सांगितले की, जर पिगासस सॉफ्टवेअर इत्यादीसारखे कोणतेही स्पायवेअर डिव्हाइसमध्ये स्थापित केले असेल तर एजन्सीला डिव्हाइसमध्ये प्रवेश असेल. अशा परिस्थितीत एजन्सी व्हॉट्सॲप चॅटमध्ये प्रवेश करू शकतात. तसंच, या जोखमींचा विचार करून, अलीकडेच व्हॉट्सॲपवर अनेक प्रायव्हसी फीचर्स जोडण्यात आली आहेत, ज्यामध्ये डिसअपियरिंग मेसेज इत्यादींचा समावेश आहे. हे फीचर विशिष्ट वेळी डिव्हाइसवरून चॅट हटवते. अशा स्थितीत चॅट्सची गोपनीयता राखली जाते.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
WhatsApp चॅटही होऊ शकते लीक? मार्क झुकरबर्गने वाढवलं यूझर्सचं टेन्शन
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement