Fake Currency : 500 ची नोट असली की नकली? फक्त ‘या’ एका चिन्हावरून करा पैशांची ओळख
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Fake Currency : नकली नोट आपल्या हातात कशा येतात, हे बऱ्याच वेळा आपल्यालाच समजत नाही. त्या एखाद्या दुकानातून, बाजारातून किंवा व्यवहारात नकळत आपल्या हातात येऊ शकतात. आणि हो, या फक्त ₹500 च्याच नसतात. त्या ₹100, ₹50 किंवा ₹20 च्याही नकली नोटा असू शकतात.
सध्या स्कॅमर्सची काही कमी नाही. ते लोकांना गंडा घालण्याचे किंवा फसवण्याचे वेगवेगळे मार्ग अवलंबतात. त्यात बनावट नोटा देखील बाजारात मिळायला लागल्या आहेत, त्यामुळे रोकड रक्कम वापरताना देखील सतर्क राहण्याची गरज आहे. वेळोवेळी अशा बातम्या येत राहतात की बाजारात खोट्या नोटा खूप फिरत आहेत, पण बहुतेकांना वाटतं की एटीएममधून नकली नोट येत नाहीत आणि ते खरंही आहे, कारण बँकांना एटीएममध्ये नकली नोट ठेवण्याची परवानगी नसते.
advertisement
तरीसुद्धा, नकली नोट आपल्या हातात कशा येतात, हे बऱ्याच वेळा आपल्यालाच समजत नाही. त्या एखाद्या दुकानातून, बाजारातून किंवा व्यवहारात नकळत आपल्या हातात येऊ शकतात. आणि हो, या फक्त ₹500 च्याच नसतात. त्या ₹100, ₹50 किंवा ₹20 च्याही नकली नोटा असू शकतात.
advertisement
अलीकडेच एका व्यक्तीला ₹500 च्या दोन नकली नोटा मिळाल्या. विशेष म्हणजे त्या नोटांवर असली नोटांसारखीच चमकदार पट्टी (Security Thread) होती. पूर्वी नकली नोटांमध्ये ही पट्टी नसायची, कारण ती छापणं तांत्रिकदृष्ट्या अवघड असतं. ही पट्टी खरी नोटांमध्ये आतून घातली जाते. त्यामुळे तिची नक्कल करणे जवळपास अशक्य असतं. पण आता नकली नोटांमध्येही ही पट्टी दिसू लागली आहे आणि त्यामुळे सामान्य लोकांची फसवणूक आणखी सोपी झाली आहे.
advertisement
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार, वित्त वर्ष 2024-25 मध्ये तब्बल 2.17 लाख नकली नोटा पकडल्या गेल्या, त्यापैकी 1.17 लाख या ₹500 च्या होत्या. 500 रुपयांच्या नोटांच्या प्रचलनात तब्बल 37 टक्क्यांनी वाढ झाल्याचंही RBI च्या आकडेवारीत दिसतं. म्हणजेच, खोट्या नोटांचं प्रमाणही त्याच वेगाने वाढतंय.
advertisement
पण अनेकांसमोर असा प्रश्न उभा राहिला की खरी आणि नकली नोट ओळखायची कशी?प्रत्येक भारतीय नोटेमध्ये गांधीजींचा वॉटरमार्क असतो. त्यामुळे नोट प्रकाशात धरली की गांधीजींची प्रतिमा दिसते. त्याचप्रमाणे, नोटेच्या किंमतीनुसार 100, 500 किंवा 2000 असा आकडा वॉटरमार्कच्या स्वरूपात स्पष्ट दिसतो. हे तपासून आपल्याला हे सहज कळवू शकते की नोट खरी आहे की नकली.
advertisement
गृह मंत्रालयाच्या माहितीनुसार, हे नकली नोटांचे जाळं शेजारील देशांतून भारतात येतंय, असा संशय आहे. या नोटा सुमारे 90 ग्रॅम लिनेन-कॉटन पेपरवर छापल्या जातात आणि एका नोटेची किंमत फक्त ₹2-3 एवढी पडते. यामुळे या नोटा छोट्या व्यवहारांमधून म्हणजे दुकानात, बाजारात नकळत पसरवल्या जातात.
advertisement