ना नवरा ना मुलं, 100 कोटींच्या बंगल्यात एकटीच राहते अभिनेत्री, शाहरुख-सलमान तिचे शेजारी
- Published by:Minal Gurav
Last Updated:
सलमान खान आणि शाहरुख खानच्या शेजारी एका प्रसिद्ध अभिनेत्रीचे घर आहे. त्याची किंमत 100 कोटी रुपये आहे. पण तिथे फक्त दोनच लोक राहतात. या अभिनेत्रीने तिच्या आयुष्यात प्रचंड प्रसिद्धी आणि पैसा मिळवला आहे. पण तिच्या 100 कोटींच्या घरात राहायला कोणीच नाही.
या अभिनेत्रीने अनेक दशके चित्रपटसृष्टीवर राज्य केले आहे. तिने बॉलिवूड तसेच दक्षिणेतही काम केले आहे आणि प्रचंड प्रसिद्धी मिळवली आहे. आजही चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी आतुर आहेत.
advertisement
ही अभिनेत्री आता 71 वर्षांची आहे. पण तिचे सौंदर्य आणि अभिनय कौशल्य अजिबात कमी झालेले नाही. तुम्ही तिचे अनेक चित्रपट आणि गाणी पाहिली असतील.
advertisement
आपण ज्या अभिनेत्रीच्या घराबद्दल बोलतोय ती अभिनेत्री म्हणजे रेखा. रेखा मुंबईच्या एका पॉश परिसरात राहते. ती जितकी एक उत्तम अभिनेत्री आहे तितकीच लॅविश आयुष्य जगते. तिचं घर सुंदर आणि लग्झरी आहे.
advertisement
रेखाच्या घराचं नाव बसेरा असं आहे. मुंबईच्या पॉश बँडस्टँड परिसरात हे घर आहे. अभिनेत्रीचं घर शाहरुख खानसह इतर अनेक मोठ्या स्टार्सच्या परिसरात आहे.
advertisement
रेखाचं घर बाहेरून जितकं सुंदर आहे तितकंच आतूनही लॅविश आहे. आधुनिकता आणि ग्रीनरी याचं मिश्रण आहे. घराच्या बाहेरील बाजूस "बसेरा" नावाची नेमप्लेट आहे.
advertisement
घराच्या आतील भागात लाकडी काम अतिशय सुंदरपणे केलेलं आहे. तिच्या घराचं छत एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही. घराला पांढऱ्या भिंती आणि मोठ्या खिडक्या आहेत.
advertisement
बसेराला पितळी दिवे, रेशमी पडदे आणि इतर विविध फर्निचरने सजवलेले आहे. संपूर्ण घर विचारपूर्वक सजवलेले आहे. असे म्हटले जाते की रेखाने स्वतः प्रत्येक बारकाव्याची काळजीपूर्वक रचना केली आहे.
advertisement
रेखाच्या घराच्या प्रवेशद्वारावर एक मोठी छत्रीची रचना आहे जी बंगल्याच्या सौंदर्यात भर घालते. असे म्हटले जाते की ही रचना रेखाच्या प्रसिद्ध चित्रपट उमराव जानची आठवण करून देते.
advertisement
रेखाकडे मोठे घर आहे, पण त्या घरात फक्त दोनच लोक राहतात. एक रेखा आणि दुसरी तिची सेक्रेटरी फरजाना. रेखाला मुलं नाहीत ना तिचं कुटुंब. रेखाच्या या आलिशान घरात बाहेरील कोणालाही येण्यास परवानगी नाही. अनेक वर्ष इंडस्ट्रीतील कोणीच तिच्या घरी गेलेलं नाही.
advertisement
असं म्हणतात रेखा अनेकांच्या प्रेमात पडली पण तिला खरं प्रेम कधीच मिळालं नाही. तिने दिल्लीतील व्यावसायिक मुकेश अग्रवालशी लग्नही केल होतं पण काही दिवसांत तिच्या नवऱ्यानं आत्महत्या करत आयुष्य संपवलं. त्यानंतर रेखा आजपर्यंत एकटी आयुष्य जगतेय.
advertisement