6 मिनिटे 35 सेकंदचं ते गाणं 'जोधा अकबर'साठी एआर रहमानने बनवलंच नव्हतं; समोर आली INSIDE STORY
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
AR Rahman : जोधा अकबर या चित्रपटातील हे गाणं जितकं सुंदर आणि मनाला शांती देणारं आहे तितकीच या गाण्यामागची गोष्टही रंजक आहे. नुकतचं ए.आर. रहमान यांनी हे गाणं या चित्रपटाचा भाग कसं बनलं याबाबत सांगितलं आहे.
आशुतोष गोवारीकर यांच्या 2008 रोजी आलेल्या 'जोधा अकबर' या चित्रपटातील हे गाणं आहे. ए.आर. रहमान यांनी एका मुलाखतीत सांगितलं की हे गाणं खरं तर या चित्रपटासाठी नव्हतं.
advertisement
ए.आर रहमान जेव्हा अजमेर शरीफच्या यात्रेवर गेले होते, तेव्हा त्यांनी हे गाणं ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या पवित्र सूफी दरगाहवर लिहिलं होतं.
advertisement
रहमान म्हणाले की,"तिथल्या एका व्यक्तीने मला विचारलं,"तू ख्वाजांसाठी एक गाणं का लिहीत नाहीस? तू ‘पिया हाजी अली’ गायलेस, पण ख्वाजासाठी काहीच नाही.’’
advertisement
advertisement
रहमान पुढे म्हणाले,"मी ऑस्ट्रेलियाला जात होतो आणि मला एक धून सापडत नव्हती. म्हणून मी ती ख्वाजांना अर्पण करण्याच्या भावनेतून वापरून पाहिली. मी संपूर्ण गाणं रेकॉर्ड केलं आणि गीतकार काशिफ यांना ते पूर्ण करण्यास सांगितलं. एक वर्षानंतर आशुतोष गोवारीकर माझ्याकडे 'जोधा अकबर' हा चित्रपट घेऊन आले".
advertisement
आशुतोष गोवारीकर यांनी सांगितलं की, चित्रपटात एक सीन आहे ज्यात बादशहा अकबर अजमेर दरगाहला जातो. त्यावर रहमान हसत म्हणाले,"मी म्हणालो,'थांब, माझ्याकडे एक गाणं आहे'.
advertisement