IND vs WI : 'तू धावा करायच्या नाहीस', सिराज ऑन ड्यूटी! भर मैदानात वेस्ट इंडिजच्या खेळाडूला धमकावलं

Last Updated:

मोहम्मद सिराजने थेट वेस्ट इंडिज खेळाडूला धमकावलं आहे.त्यामुळे त्याच्या या राड्याची प्रचंड चर्चा रंगली आहे.

mohammad Siraj warns justin greave
mohammad Siraj warns justin greave
India vs West Indies : टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज आणि DSP सिराज मैदानात नेहमीच चर्चेत असतो. कधी तो गोलंदाजीने कहर करतो तर कधी तो प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या अंगावर धावुन जातो.असाच काहीसा प्रकार वेस्ट इंडिज विरूद्धच्या शेवटच्या टेस्ट सामन्यात घडला आहे. कारण आज मोहम्मद सिराजने थेट वेस्ट इंडिज खेळाडूला धमकावलं आहे.त्यामुळे त्याच्या या राड्याची प्रचंड चर्चा रंगली आहे.
खरं तर भारताने फॉल ऑन दिल्यानंतर वेस्ट इंडिजने जबरदस्त कमबॅक केले.वेस्ट इंडिजच्या सलामीवीर खेळाडूंपासून ते शेवटच्या बॉलरपर्यंत खेळाडूंनी चांगली फलंदाजी केली.यावेळी वेस्ट इंडिजचे 9 विकेट पडल्यानंतर शेवटची विकेट पडतच नव्हती. जयडेन सिल्स आणि जस्टीन ग्रिव्सने शेवटच्या विकेटसाठी खतरनाक बचावात्मक फलंदाजी केली.ज्यामुळे टीम इंडियाच्या गोलंदाजांना विकेटच काढता आली नाही.
दोन्ही खेळाडूंनी तब्बल 74 धावांची पार्टनरशीप केली होती.या पार्टनरशीपने टीम इंडियाच्या गोलंदाजांचा घाम फोडला होता.जयडेन सिल्स आणि जस्टीन ग्रिव्स हे आपली विकेटच टाकायला तयार नव्हते.त्यात जस्टीन ग्रिव्सने आपले अर्धशतकही ठोकले होते.त्यामुळे वेस्ट इंडिजची शेवटची विकेट पडत नसल्याने भारतीय खेळाडू प्रचंड चिडले होते. यातच मोहम्मद सिराजला प्रचंड राग आला होता. त्यामुळे तो रागाच्या भरात जस्टीन ग्रीव्स जवळ जातो आणि त्याला म्हणतो 'तु आता धावा करायच्या नाहीस', अशा शब्दात त्याला मजेशीर धमकावण्याचा प्रयत्न करतो. सिराजच्या या धमकीला जस्टीन ग्रीव्स हसून उत्तर देतो. या संदर्भातला फोटो देखील व्हायरल झाला आहे.
advertisement
दरम्यान यानंतर पुढे जसप्रीत बुमराह जयडेन सील्सला 32 धावांवर आऊट करतो आणि वेस्ट इंडिजचा दुसरा डाव 390 धावांवर ऑल आऊट होतो.त्यामुळे वेस्ट इंडिजला फक्त 120 धावांची आघाडी घेता येते. त्यामुळे टीम इंडियासमोर 121 धावांचे लक्ष्य असते.
टीम इंडियासमोर 121 धावांचे लक्ष्य
वेस्ट इंडिजने दिलेल्या 121 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यशस्वी जयस्वाल 8 धावांवर बाद होतो.त्याच्यानंतर चौथा दिवस संपेपर्यंत केएल राहुल 25 धावांवर आणि साई सुदर्शन 30 धावांवर नाबाद आहे. टीम इंडियाला जिंकण्यासाठी अजून 58 धावांची आवश्यकता आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs WI : 'तू धावा करायच्या नाहीस', सिराज ऑन ड्यूटी! भर मैदानात वेस्ट इंडिजच्या खेळाडूला धमकावलं
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement