Rohit Sharma : श्रेयसने केला ट्रॉफीचा अपमान, 'मुंबईच्या राजा'ने दाखवले संस्कार, रोहितचा Video पाहून कराल सल्यूट!

Last Updated:

श्रेयस अय्यरकडून झालेली चूक रोहित शर्माने सुधारली, याचा व्हिडिओ पाहून चाहते रोहित शर्माचं कौतुक करत आहेत.

श्रेयसने केला ट्रॉफीचा अपमान, 'मुंबईच्या राजा'ने दाखवले संस्कार, रोहितचा Video पाहून वाटेल अभिमान!
श्रेयसने केला ट्रॉफीचा अपमान, 'मुंबईच्या राजा'ने दाखवले संस्कार, रोहितचा Video पाहून वाटेल अभिमान!
मुंबई : टीम इंडियाला 7 महिन्यांपूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवणारा रोहित शर्मा पुन्हा एकदा टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसणार आहे. 19 ऑक्टोबरपासून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या वनडे मॅचच्या सीरिजला सुरूवात होत आहे, या सीरिजमध्ये रोहित शर्माची बॅटिंग बघण्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. रोहितची वनडे टीमची कॅप्टन्सी गेल्यानंतर चाहत्यांनी बीसीसीआयवर मोठ्या प्रमाणावर टीका केली. बीसीसीआयने भारतीय क्रिकेटच्या हिरोसोबत अन्याय केल्याच्या भावना चाहत्यांनी व्यक्त केल्या आहेत. रोहित शर्मा चाहत्यांचा एवढा फेवरेट का आहे? हे पुन्हा एकदा एका व्हिडिओमुळे सिद्ध झालं आहे.
सिएट अवॉर्ड्सच्या वेळी श्रेयस अय्यरकडून झालेली चूक रोहित शर्माने सुधारली, याचा व्हिडिओ पाहून चाहते रोहित शर्माचं कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. श्रेयस अय्यरला त्याच्या मागच्या वर्षातल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ट्रॉफी देऊन गौरवण्यात आलं. ही ट्रॉफी घेऊन श्रेयस अय्यर स्टेजवरून खाली आला आणि खूर्चीवर जाऊन बसला, तेव्हा त्याने ट्रॉफी पायाजवळ ठेवली. श्रेयस अय्यरच्या मागे रोहित शर्मा बसला होता. ट्रॉफी खाली ठेवल्यानंतर श्रेयस अय्यर कार्यक्रम बघण्यात बिझी झाला.
advertisement

रोहितच्या कृतीचं चाहत्यांकडून कौतुक

रोहित शर्माने अजिबात वेळ न घालवता ट्रॉफी जमिनीवरून उचलली आणि टेबलवर ठेवली. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या एका चाहत्याने रोहितचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर शेअर केला. रोहितचा हा व्हिडिओ पाहून चाहते त्याचं कौतुक करत आहेत.
advertisement

रोहितने संपवला ट्रॉफीचा दुष्काळ

रोहित शर्माने टीम इंडियाचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ 11 वर्षांनंतर संपवला. 2024 टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा विजय झाला, यानंतर 2025 मध्ये टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकली, या दोन्ही स्पर्धांमध्ये रोहित शर्मा टीम इंडियाचा कर्णधार होता.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : श्रेयसने केला ट्रॉफीचा अपमान, 'मुंबईच्या राजा'ने दाखवले संस्कार, रोहितचा Video पाहून कराल सल्यूट!
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement