'माशाल्लाह, क्या दूधिया बदन है', तमन्नासाठी 69 वर्षीय अभिनेत्याची अश्लील कमेंट, स्वतःला म्हणाले लहान मुलगा

Last Updated:

Bollywood controversy : बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्याने अभिनेत्री तमन्ना भाटियाबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या सोशल मीडियावर मोठा गदारोळ माजला आहे.

News18
News18
मुंबई : बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते अन्नू कपूर यांनी अभिनेत्री तमन्ना भाटिया हिच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या सोशल मीडियावर मोठा गदारोळ माजला आहे. ६९ वर्षांच्या अन्नू कपूर यांनी एका मुलाखतीत तमन्नाबद्दल वादग्रस्त टिप्पणी केल्याने नेटकऱ्यांनी त्यांची जोरदार शाळा घेतली आहे.

नेमकी काय आहे ती वादग्रस्त कमेंट?

अलीकडेच एका मुलाखतीत अन्नू कपूर यांना विचारण्यात आले होते की, त्यांना तमन्ना भाटिया ही अभिनेत्री आवडते का? या प्रश्नावर हसत-खेळत उत्तर देताना अन्नू कपूर म्हणाले, "माशाअल्लाह, क्या दूधिया बॉडी है!" अन्नू कपूर यांनी हे विधान विनोदी अंदाजात केले असले तरी, सोशल मीडिया युजर्सनी हे वक्तव्य लगेचच उचलून धरले आणि त्यांना सुनवायला सुरूवात केली आहे. नेटकऱ्यांनी अन्नू कपूर यांच्या या कमेंटला अश्लील आणि सेक्सिस्ट ठरवत त्यांच्यावर टीका केली आहे.
advertisement
यावेळी अन्नू कपूर यांनी तमन्ना भाटियाच्या एका पूर्वीच्या विधानाचाही उल्लेख केला. तमन्ना म्हणाली होती की, अनेक महिलांनी तिला सांगितले की, त्यांची मुले तिचे 'आज की रात' हे गाणे बघतच जेवण करतात-झोपतात.
advertisement
यावर प्रतिक्रिया देताना अन्नू कपूर यांनी 'मुलांचे वय किती असते?' असा प्रश्न विचारला आणि स्वतःच उत्तर दिले, "सत्तर वर्षांचे लोकही लहान मूल असू शकतात ना?" त्यांनी पुढे म्हटले की, 'मी असतो तर नक्की विचारले असते की, किती वर्षांची मुले असे करतात?' अन्नू कपूर यांची ही टीकाही त्यांच्या विचारांची विकृत बाजू दर्शवणारी असल्याची भावना सोशल मीडियावर व्यक्त होत आहे.
advertisement

नेटकऱ्यांनी धरलं धारेवर

अन्नू कपूर यांच्या या कमेंटवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी त्यांचे विधान अपमानजनक आणि विकृत असल्याचे म्हटले आहे. एका युजरने थेट प्रश्न विचारला, "अन्नू कपूर जी, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती!" तर दुसऱ्या युजरने "हेच ते आपल्या मुलीलाही असेच बोलत असतील का?" अशा कठोर शब्दांत टीका केली आहे. महिलांचा अनादर करणाऱ्या या कमेंटमुळे अन्नू कपूर सध्या ट्रोल होत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'माशाल्लाह, क्या दूधिया बदन है', तमन्नासाठी 69 वर्षीय अभिनेत्याची अश्लील कमेंट, स्वतःला म्हणाले लहान मुलगा
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement