'एक नंबरचा नालायक...' स्मृती इराणी समोरच सलमानवर ओरडले होते सलीम खान, अभिनेत्रीची हसून हसून वाईट अवस्था
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Salman Khan : स्मृती इराणी यांनी सलमान खानसोबतच्या त्यांच्या पहिल्या भेटीचा एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. यावेळी चक्क सलमानला वडिलांकडून जोरदार ओरडा मिळाला होता!
मुंबई: बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खान आपल्या दमदार अभिनयासाठी आणि त्याच्या तुफान फॅन फॉलोविंगसाठी लोकप्रिय आहे. त्याचं आपल्या कुटुंबावर आणि विशेषतः वडील सलीम खान यांच्यावर खूप प्रेम असून तो त्यांचा खूप आदर करतो.
advertisement
नुकतंच राजकारणात सक्रिय असलेल्या आणि एकेकाळी टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय सूनबाई म्हणून गाजलेल्या स्मृती इराणी यांनी सलमान खानसोबतच्या त्यांच्या पहिल्या भेटीचा एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. यावेळी चक्क सलमानला वडिलांकडून जोरदार ओरडा मिळाला होता!
advertisement
मायशेबल इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत स्मृती इराणी यांनी हा किस्सा सांगितला. स्मृती म्हणाल्या, "सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये सलमान आणि माझे पती जुबिन इराणी दोघेही एकाच वर्गात होते. ते मित्र होते."
advertisement
"जेव्हा जुबिन मला पहिल्यांदा सलमानला भेटायला घेऊन गेले, तेव्हा तिथे सलीम खान साहेबही उपस्थित होते. सलीम खान यांनी मला पाहिले आणि म्हणाले, 'तुला माहीत आहे का, तुझे मियाँ माझ्या मुलासोबत काय करायचे?'"
advertisement
advertisement
स्मृती इराणी म्हणाल्या की, त्या तिथे फक्त शांत उभ्या होत्या, तर सलमान आणि त्यांचे पती जुबिन दोघेही खाली पाहत उभे होते. आपल्या सुपरस्टार मुलाला वडिलांसमोर इतकं साधं आणि शांत उभं राहिलेलं पाहून स्मृती यांना हसू आवरले नाही.
advertisement
याच मुलाखतीत स्मृती इराणी यांनी शाहरुख खानसोबतच्या पहिल्या भेटीचाही किस्सा सांगितला. त्यांचे पती जुबिन, शाहरुखला ओळखत असल्याने ही भेट झाली होती. स्मृती अनेकदा जुबिन यांना शाहरुखची मुलाखत घेण्यासाठी आग्रह करायच्या.
advertisement
स्मृतींनी सांगितले, "शाहरुख मला पहिल्यांदा भेटल्यावर म्हणाला, 'ऐक, लग्न करू नकोस. मी सांगतोय तुला, लग्न करू नकोस!'" त्यावर स्मृती हसून म्हणाल्या, "मी मनात विचार केला की, भाई... आता खूप उशीर झाला आहे!"
advertisement