Geuss Who : वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून करतेय काम, आता TVची खलनायिका, 'या' मराठी अभिनेत्रीला ओळखलं का!
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Marathi Actress : टेलिव्हिजनवर आजवर अनेक खलनायिका पाहायला मिळाल्या आहेत. पण अवघ्या विसाव्या वर्षी या अभिनेत्रीनं खलनायिका बनून सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मुंबई : कलाकारांचे अनेक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत असतात. सध्या मराठी टेलिव्हिजनवर खलनायिकेची भूमिका साकारणाऱ्या एका अभिनेत्रीचा बालपणाची फोटो व्हायरल होतोय. फोटोमध्ये एक छोटी मुलगी देवासमोर हात जोडून उभी आहे. क्यूट स्माइल करत ती कॅमेरात बघतेय. तिच्या फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. ही चिमुकली वयाच्या तिसऱ्या वर्षापासून अभिनय क्षेत्रात काम करतेय आता ती 20 वर्षांची झाली असून खलनायिकेची भूमिका करतेय.
टेलिव्हिजनवर आजवर अनेक खलनायिका पाहायला मिळाल्या आहेत. पण अवघ्या विसाव्या वर्षी या अभिनेत्रीनं खलनायिका बनून सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. फोटोमध्ये दिसणाऱ्या या चिमुकलीने दहा वर्षांआधी झी मराठीवरी एक मालिका केली होती. आता ती मोठी झाली असून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
advertisement
फोटोमध्ये दिसणारी ही चिमुकली दुसरी तिसरी कोणी नसून कमळी मालिकेतील अनिका आहे. अभिनेत्री केतकी कुलकर्णी असं तिचं नाव आहे. तिची मालिकेतील भूमिका सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. या भूमिकेतील तिचा अभिनय आणि अस्तित्व प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवत आहे.

कमळी या यशस्वी शोच्या माध्यमातून, केतकी आपल्या अभिनय क्षेत्रातील दहाव्या वर्षात पुन्हा एकदा झी मराठीवर झळकत आहे, हे एक विलक्षण योगायोग ठरतोय. केतकीच्या अभिनय प्रवासाची सुरुवात 10 वर्षांपूर्वी झी मराठीवरील "अस्मिता" या गाजलेल्या मालिकेतून झाली होती. पूजा ही भूमिका करताना केतकी पहिल्यांदा छोट्या पडद्यावर झळकली होती.
advertisement

केतकी म्हणाली, "मी तीन वर्षांची असल्यापासून टीव्हीवर स्वतःला पाहण्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि झी मराठीमुळे ते पूर्ण झालं. तेव्हापासून आजवर मी 12 महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये अभिनय केला आहे. झी मराठी हे माझ्या करिअरचं पहिलं व्यासपीठ ठरलं आणि झी स्टुडिओज अंतर्गत माझा पहिला चित्रपटही प्रदर्शित झाला. त्यामुळे झी ही संस्था केवळ एक चॅनल न राहता माझ्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनली आहे. लहानपणापासून झी मराठीवरील कार्यक्रम पाहत आली आहे , आज त्या परिवाराचा भाग आहे, ही भावना माझ्यासाठी अतिशय खास आहे."
advertisement
केतकी पुढे म्हणाली, "या 10 वर्षांत मी अनेक चढ-उतार अनुभवले. संघर्ष, नकार, संधींची प्रतीक्षा हे सगळं शिकताना, मी कायम पाय जमिनीवर ठेवले. या क्षेत्रात वेळच सर्व खेळ आहे, वाट पाहायची, देवावर विश्वास ठेवायचा, मेहनत करायची की यश नक्की मिळतं."
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 13, 2025 7:01 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Geuss Who : वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून करतेय काम, आता TVची खलनायिका, 'या' मराठी अभिनेत्रीला ओळखलं का!