आयटीआय पर्यंत शिक्षण घेऊन संकेत आणि समाधान यांनी नोकरीच्या मागे न धावता काहीतरी वेगळे करायचा निर्णय घेतला. आज बाजारात सर्वत्र इलेक्ट्रिक वाहनांना मागणी अधिक आहे. पण त्या गाड्यांना वेग मर्यादा ठराविक आहे. दोन्ही मित्रांनी एकत्रित बसून पेट्रोलच्या दुचाकी वाहनाला इलेक्ट्रिक हायब्रीड मोटरसायकल मॉडेल पद्धतीने वाहन बनवण्याचा निर्णय घेतला.
जवळपास दोन वर्ष याचा अभ्यास करून अखेर संकेत आणि समाधान यांनी पेट्रोल+इलेक्ट्रिक हायब्रिडवर आधारित दुचाकी वाहन बनवले आहे. या गाडीला एकदा चार्ज केल्यावर 100 किलोमीटर पर्यंत चालते तसेच या गाडीला वेग मर्यादा देखील अधिक आहे. या एका दुचाकी वाहनाला पेट्रोल आणि चार्जिंग वाहनांसाठी दोन चावीचे स्विच बसवलेले आहे. चार्जिंग संपल्यावर त्याच गाडीला आपण पेट्रोलवर सुद्धा चालू करू शकतात. इलेक्ट्रिक मोडवर गाडी वापरत असताना गाडीचा आवाज कमी आणि धूर देखील येत नाही.
advertisement
पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी बातमी, विठ्ठल-रुक्मिणी मातेची पाद्यपूजा 11 दिवस राहणार बंद
दोन वर्षाच्या केलेल्या मेहनतीचे फळ संकेत आणि समाधानला मिळाले आहे. पेट्रोल+इलेक्ट्रिक हायब्रिड तंत्रज्ञानावर आधारित दुचाकी वाहन बनवण्यासाठी जवळपास 60 हजार रुपये पर्यंतचा खर्च आला आहे. तर या दुचाकी वाहनावर लोडिंग कॅपॅसिटी 200 किलोपर्यंत आहे. यामुळे नवीन गाडीवर लाख ते दीड लाख रुपये खर्च न करता जुन्याच दुचाकी वाहनाला पेट्रोल+इलेक्ट्रिक हायब्रिड वाहन बनवून देण्याचे काम संकेत आणि समाधान करत आहे.
पेट्रोल+इलेक्ट्रिक हायब्रिड दुचाकी वाहन बनवण्यासाठी आतापर्यंत 5 ते 6 गाड्या आल्या आहेत. एका दुचाकी वाहन गाडीला पेट्रोल+इलेक्ट्रिक हायब्रिड वाहन बनवण्यासाठी 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागतो तसेच दुचाकीला मोटरसायकल मॉडेल बनवण्यासाठी 60 ते 70 हजार रुपये पर्यंत खर्च येतो. नवीन गाड्यांवर खर्च न करता एकदा गॅरेजमध्ये येऊन गाडी पाहून विचार करून गाडी बनवावी, असे आवाहन संकेत जाधव यांनी केले आहे.





