एसबीआयने दिला इशारा
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक - स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना टेक्स्ट मेसेजद्वारे सावध केले आहे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. SBI ने मेसेजमध्ये लिहिले आहे, 'प्रिय SBI ग्राहक, अप्रत्याशित डिपॉझिटनंतर त्वरित पैसे काढण्याच्या रिक्वेस्टपासून सावध रहा. व्हेरिफिकेशनशिवाय कलेक्ट UPI रिक्वेस्ट मंजूर करू नका.
फरशी पुसण्याचं टेन्शनचं नाही, स्वस्तात मिळतोय Robot Vacuum Cleaner; किंमत किती?
advertisement
UPI च्या नावाने फसवणूक कशी होते?
खरंतर, अनेक बनावट UPI ॲप्स ॲप स्टोअरवर उपलब्ध झाले आहेत. जे हुबेहुब खऱ्या UPI सारखे दिसतात. सायबर गुन्हेगार या बनावट ॲप्सद्वारे तुमच्या नंबरवर व्यवहार करतील आणि त्याचा स्क्रीनशॉट घेतील. यानंतर, ते तुमच्या बँकेच्या नावाने तुमच्या नंबरवर UPI द्वारे तुमच्या अकाउंटवर पैसे आले असल्याचा बनावट मेसेज पाठवतील. आता हे गुन्हेगार तुम्हाला स्क्रीनशॉट आणि मेसेजचा हवाला देऊन कॉल करतील आणि सांगतील की त्यांनी तुमच्या नंबरवर चुकून UPI द्वारे पैसे पाठवले आहेत. यानंतर ते तुम्हाला त्यांचा UPI नंबर देतील आणि लवकरात लवकर पैसे परत मागतील.
तासंतास Smartphone चालवण्याची सवय आहे? या स्टेप्स फॉलो करुन होईल फायदा
UPI वापरणाऱ्या सर्व लोकांनी सावध राहण्याची गरज आहे
तुमच्यासोबतही असे घडत असेल तर सावधान. असे झाल्यास, सर्वप्रथम, आपण घाईघाईने कोणतेही पाऊल उचलू नये. आता तुम्हाला तुमच्या अकाउंटवर खरंच पैसे आलेय की नाही हे चेक करावे लागेल. जर तुम्हाला पैसे मिळाले नाहीत तर थेट सायबर क्राईम हेल्पलाइन नंबरवर कॉल करा आणि तक्रार नोंदवा.