हिंगोली, प्रतिनिधी मनीष खरात : हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील सिनगी नागा गावात वस्तीत भागातील स्मशानभूमी नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांना मयत वृद्ध महिलेवर कसाबसा चिखलात अंत्यविधी उरकून घ्यावा लागला आहे. या ग्रामस्थांनी स्मशानभूमीसाठी अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही प्रशासन व लोकप्रतिनिधीकडून दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे.