मोसंबीचं आगार म्हणून जालना जिल्ह्याची ओळख. परंतु सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसाने येथील मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. मोसंबी बागेवर असलेली 20 टन मोसंबी आता दोन टन देखील शिल्लक राहिली नाही. त्यामुळे बहिणीचे लग्न आणि सावकाराचं कर्ज या फेऱ्यात शेतकरी अडकलाय. जालन्यातील तळेगाव येथील शेतकरी श्री किशन शिवतारे यांची व्यथा देखील अशीच आहे. लोकलटींनी ती जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहुयात.