कोल्हापूर : आपण अलीकडे आलेल्या वेब सिरीज किंवा एखाद्या चित्रपटामध्ये एखाद्याला संमोहित करून त्याच्याकडून हवं ते करून घेता येतं असं दाखवलं जातं. पण एखाद्या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे व्यक्तीला संमोहित करणं आणि त्याच्याकडून हवं ते करून घेणं, चित्रपटात दाखवल्याप्रमाणे या गोष्टीमध्ये कितीपत तथ्य आहे? हे तुम्हाला माहिती आहे का? संमोहन शास्त्र हे फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. याबद्दल लोकांना फार काही अशी माहिती नाही. अंधश्रद्धाळू भीती आणि अशास्त्रीय गैरसमजामुळे नेहमीच हे शास्त्र गूढ वाटत राहिले आहे. पण संमोहनातून एखाद्या कडून हवं ते करून घेता येऊ शकतं का? याबद्दच कोल्हापुरातील मानसोपचार आणि संमोहन उपचार तज्ज्ञ डॉक्टर उत्तम गव्हाणे यांनी माहिती दिली आहे.