TRENDING:

अखेर आई-मुलांची भेट झाली, कोल्हापुरातला VIDEO पाहून व्हाल Emotional

Last Updated : कोल्हापूर
ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी कोल्हापूर: करवीर तालुक्यातील खूपीरे गावांमधील कोंढार शेत नावाने ओळखल्या जाणाऱ्या भागामधील रामराव पाटील या शेतकऱ्याच्या शेतामधील ऊस तोडणी चालू असताना दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या वाघाटी (Rusty Spotted Cat) या रान मांजराची दोन पिल्ले आढळून आली. कोल्हापूर वनविभागाचे वन्यजीव बचाव पथक तत्काळ त्या ठिकाणी दाखल झाले. प्रथमदर्शनी ती पिल्ले खूपच लहान असल्याकारणाने त्यांचे व त्यांच्या आईचे पुनर्मिलन घडवून आणण्याचे वन्यजीव बचाव पथकाने ठरवले त्यानुसार ती पिल्ले त्याच ठिकाणी ठेवून त्यांच्यावर सीसीटीव्ही कॅमेराद्वारे नजर ठेवण्यात आली दिनांक 14 तारखेला रात्री साडे अकराच्या सुमारास त्या पिल्लांच्या आईने त्या ठिकाणी येऊन एका पिल्लास सुरक्षित ठिकाणी घेऊन गेली.
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/कोल्हापूर/
अखेर आई-मुलांची भेट झाली, कोल्हापुरातला VIDEO पाहून व्हाल Emotional
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल