'महादेवी' हत्तीणीला लवकरात लवकर कोल्हापुरात आणू' आणि 'महादेवी'साठी नांदणीच्या मठातच निवारा केंद्र उभारू, अशी माहिती वनताराचे सीईओ विहान करणी यांनी दिली आहे. नांदणी मठाचे स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक स्वामी यांच्या सोबत 'वनतारा'च्या सीईओंची बैठक पार पडली. या बैठकीनंतर दोघांनीही संयुक्त पत्रकार परिषद घेत याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. यावेळी नांदणी मठाच्या स्वामींनी वनतारासह अनंत अंबानींच्या या भूमिकेचं कौतुक केलं.