मुंबई: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात प्रगती जगदाळे यांच्या पतीचा मृत्यू झाला होता. आम्हाला न्याय द्या अशी मागणी कुटुंबीय करत होते. अखेर 14 दिवसांनंतर भारतीय सैन्य दलाने मोठी कारवाई केली. पाकिस्तानच्या 6 मुख्य ठिकाणांवर एअर स्ट्राइक करुन दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर नाव देण्यात आलं. या ऑपरेशन सिंदूरनंतर प्रगती जगदाळे यांची पहिली प्रतिक्रिया न्यूज 18 मराठीवर.