राजकारणातील सर्वात मोठी बातमी येत आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेचं वादळ उठलंय.. कारण राज ठाकरेंनीच उद्धव ठाकरेंना युतीसाठी अप्रत्यक्ष ऑफर देऊ केलीये. मराठी माणासाच्या अस्तित्वासमोरही भांडण क्षुल्लक आहेत. पण उद्धव ठाकरेंना माझ्यासोबत काम करायचं आहे का? अशी अप्रत्यक्ष ऑफरच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना दिलीये..तर राज ठाकरेंच्या प्रस्तावावर उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिलाय.. राज्याच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार.. माझ्याकडून भांडणं नव्हतीच, मिटवून टाकली.. असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.