लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक : अति मुसळधार पावसामुळे नाशिकच्या गोदावरी नदीतील पूर परिस्थिती कायम आहे. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलं आहे. गंगापूर धरणातून 8000 क्युसेक ने विसर्ग सुरू आहे. शहरात पडणारा पाऊस आणि गंगापूर धरणातून सोडलेले पाणी या मुळे गोदावरी नदीला पूर कायम आहे. गंगेवरील सर्व मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढ आहे. रामकुंड लक्ष्मण कुंड पाण्याखाली गेल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.