बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण भीषण आहे. त्यामुळे लोकांनी रस्त्यावर उतरण्यात काहीच गैर नाही असं मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. दरम्यान मुंडेंच्या मंत्रिपदाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील असं पाटील म्हणाले. तर कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदाच्या मुद्द्यावर देखील पाटलांनी सूचक विधान केल आहे.