TRENDING:

...तर कुणाचा तरी राजीनामा घेऊन मला मंत्रिपद नको, भुजबळ असं का म्हणाले?

Politics

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी छगन भुजबळांनीदेखील भाष्य केलंय. बीड प्रकरणातील दोषींवर कारवाई होणारच, तर जो दोषी असेल त्याला फाशीच द्या अशी माागणी भुजबळांनी केलीय. तर धनंजय मुंडेंचा राजीनामा का मागताय, चौकशीत मुंडेंविरोधात काही समोर आलंय का? असा सवाल करत छगन भुजबळांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केलीय. धनंजय मुंडेंवरील आरोप सिद्ध करा, असं भुजबळ म्हणालेत. तर कुणाचा तरी राजीनामा घेऊन मला मंत्रिपद नको, मंत्रिपद काही सहज मिळत नाही. कुणावरही अन्याय होता कामा नये, अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिलीय. तर नाराजीच्या प्रश्नावरदेखील भुजबळांनी भाष्य केलंय. माझ्या सर्व भावना मेल्यात, मला काहीच बोलायचं नाही. असं भुजबळ म्हणाले आहेत.

Last Updated: Jan 06, 2025, 16:42 IST
Advertisement

भारतात अस्थिरता निर्माण करण्यासाठी अमेरिका, चीन प्रयत्नशील, माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांचे मत

पुणे

भारताच्या सुरक्षेपुढे आव्हान निर्माण करण्यासाठी अमेरिका, चीन यासह अन्य काही शक्तीशाली देश प्रयत्नशील आहेत. भारताचे तुकडे करणे, भारताला अंतर्गत गोष्टीत गुंतवून

Last Updated: Dec 19, 2025, 18:22 IST

दारू पिल्यानंतर \'हे\' पदार्थ खाणं पडेल महागात, शरिरात करते मोठे नुकसान

आजच्या जीवनशैलीत पार्टी असो वा खास समारंभ, वाईन (Wine), बिअर (Beer) किंवा व्हिस्की (Whisky) सारख्या अल्कोहोलचे सेवन करणे सामान्य झाले आहे. अनेकदा लोक अल्कोहोल घेतल्यानंतर, त्याच्यासोबत किंवा दुसऱ्या दिवशी काही विशिष्ट पदार्थांचे सेवन करतात. परंतु, तुम्हाला माहित आहे का की, अल्कोहोल घेतल्यानंतर काही विशिष्ट पदार्थांचे सेवन केल्यास ते शरीराला आतून मोठे नुकसान पोहोचवू शकतात?

Last Updated: Dec 18, 2025, 20:32 IST
Advertisement

पुण्यातील १३५ वर्षे जुन्या वाड्यात मिळतोय खमंग वडापाव! निळू फुले, श्रीराम लागूही यायचे 'या' वाड्यात; पाहा Video!

Food

पुणेकरांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग असलेला वडापाव आता एका ऐतिहासिक ठिकाणी वेगळ्या ओळखीने मिळत आहे. पुण्याच्या नारायण पेठेतील १३५ वर्षे जुन्या 'निघोजकर वाड्यात' मिळणाऱ्या गरमागरम वडापावने खवय्यांना भुरळ घातली आहे. विशेष म्हणजे, सोनाली आणि संदीप बोंदार्डे हे दाम्पत्य दिवसा खाजगी कंपनीत नोकरी करून संध्याकाळी ५:३० ते ८:३० या वेळेत हा व्यवसाय चालवतात. ज्या वाड्यात कधी काळी निळू फुले आणि श्रीराम लागू यांसारखे दिग्गज येत असत, तिथे आजही नाटकांच्या सरावांसोबतच खमंग वडापावचा आस्वाद घेतला जातोय.

Last Updated: Dec 18, 2025, 19:58 IST

Food: मुळ्यासोबत हे 4 पदार्थ खाणं म्हणजे विष खाणं! शरिरात होईल असे परिणाम

Food

हिवाळ्यात ताजा मुळा (Radish) खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी, काही पदार्थांसोबत त्याचे सेवन करणे शरीरासाठी घातक ठरू शकते. मुळ्यामध्ये अनेक पोषक तत्वे असली तरी, दूध, चहा, संत्री आणि कारल्यासोबत त्याचे मिश्रण पोटाच्या गंभीर समस्या निर्माण करते. यामुळे गॅसेस, छातीत जळजळ आणि अगदी श्वसनाचे त्रासही उद्भवू शकतात. आयुर्वेदानुसार मुळा खाण्याची योग्य पद्धत काय आणि कोणत्या ४ गोष्टींपासून लांब राहावे, हे जाणून घेण्यासाठी ही महत्त्वाची माहिती नक्की वाचा!

Last Updated: Dec 18, 2025, 19:02 IST
Advertisement

महागड्या ट्रिटमेंटला म्हणा गुडबाय; घरच्या साहित्यात मिळवा पार्लरसारखा 'फेशियल ग्लो' !

हिवाळा सुरू झाला की त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू लागते.अशावेळी त्वचेची नैसर्गिक चमक टिकवून ठेवण्यासाठी ब्युटीशियन दर्शना देशमुख यांनी काही अत्यंत सोप्या आणि प्रभावी घरगुती टिप्स दिल्या आहेत. ग्लिसरीन, व्हिटॅमिन सी कॅप्सूल आणि बटाट्याच्या स्टार्चचा वापर करून घरच्या घरी 'फेशियल ग्लो' कसा मिळवायचा,हे त्यांनी या व्हिडिओतून सांगितले आहे. त्वचा तेलकट असो वा कोरडी, प्रत्येक समस्येवर या ७ खास टिप्स नक्कीच फायदेशीर ठरतील!

Last Updated: Dec 18, 2025, 17:50 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/Politics/
...तर कुणाचा तरी राजीनामा घेऊन मला मंत्रिपद नको, भुजबळ असं का म्हणाले?
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल